4664 views
तळेगाव दाभाडे दि.20 (प्रतिनिधी) यशवंतनगर येथुन राहते घरातुन दुकानात जातो असे सांगुन कुठेतरी निघुन गेल्याची घटना शुक्रवारी (दि.19) सकाळी 10:15 वा. तळेगाव दाभाडे ता.मावळ जि. पुणे हद्दीत घडली. वडीलोपर्जित जमीनीच्या वाटणीवरून किरकोळ वाद चालु असल्याने घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. सरस्वती राहुल नागलगाव वय ३३ यांनी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये हरवल्याची तक्रार दिली आहे. राहुल कल्लाप्पा नागलगाव (वय ३९, रा. यशवंतनगर, तळेगाव दाभाडे ता. मावळ) बेपत्ता व्यक्तीचे नाव आहे.
तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायण्णावर यांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार सरस्वती नागलगाव यांनी कथन केले, राहुल नागलगाव हे फॅशन फॅक्टरी नावाचे कपडयाचे दुकान चालवीत होते, ते रोज सकाळी 9 वा. दुकानात जात, रात्री 10 वा. घरी येत होते. गेल्या दीड वर्षांपासून माझे पती व माझी सासु यांच्यात त्यांच्या वडिलोपार्जित जमीनीच्या वाटणीवरून किरकोळ वाद चालु होते.
शुक्रवारी (दि.19) सकाळी 10:15 वाचे सुमारास माझे पती हे दुकानात जातो असे घरातुन निघुन गेले. त्यानंतर मला माझा भाऊ ओम बहिर्जे याने मला फोनवरून कळविले कि, राहुल यांनी त्यांच्या फोनवरून वॉटसअॅपवर मॅसेज पाठविला आहे कि, 'त्यांच्या आईने जागेच्या हिस्स्यावरून त्यांना खुप मानसिक त्रास दिला आहे. त्यामुळे कोठेतरी निघुन जात आहे. माझे पत्नीला व मुलींना सांभाळा असे मॅसेज दिल्याचे मला कळविले. त्यानतर मी लगे दुकानात गेले परंतु सदर ठिकाणी माझे पती मिळुन आले नाहीत व आमचे दुकान बंद होते. त्यानंतर मी आजुबाजुला चौकशी केली असता आमचे दुकानाशेजारी असलेले चप्पलच्या दुकानात माझे पतीचा मोबाईल व दुकानाची चावी मिळुन आली. त्यानंतर मी माझे नातेवाईक तसेच त्यांचे मित्रमंडळी याचेंकडे चौकशी केली असता त्यांची काहीच माहिती मिळुन न आल्याने माझे पती राहुल नागलगाव हे हरवले असलेबाबत तक्रार दिली.
वर्णन खालीलप्रमाणे नाव राहुल कल्लाप्पा नागलगाव वय ३९ वर्षे, रंग सावळा, उंची ५ फुट ५ इंच, बांधा मध्यम, भाषा मराठी हिंदी इंग्रजी, अंगात नेसणीस ग्रे रंगाचा शर्ट, काळया रंगाची पॅन्ट, पायात ग्रे रंगाचा बुट, उजव्या हातावर 'Swara' असे इंग्रजीमध्ये नाव गोंदलेले व डाव्या हातावर 'अदिरा' असे मराठीत नाव गोंदलेले.
पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करत आहेत.