554 views
इंदोरी दि.12 (प्रतिनिधी) येथील स्नेह मित्र मंडळ व प्रशांतदादा भागवत युवा मंच यांच्या विद्यमाने बुद्ध पौर्णिमा व भीमजयंती महोत्सव 2025 मंगळवार (दि.13) सायंकाळी 6:30 वा. बँक ऑफ महाराष्ट्रा शेजारी इंदोरी ता.मावळ निमित्ताने गायक साजन बेंद्रे व गायक विशाल चव्हाण यांच्या भीम गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची विक्रम विजय शिंदे व अक्षय जाधव यांनी दिली. सर्व भीम बंधू भगिनींनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
प्रशांतदादा भागवत युवा मंचाच्या वतीने अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा व आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असून सामाजिक ऐक्य निर्माण करण्यासाठी बुद्ध पौर्णिमा व भीमजयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.
भव्य स्टेज, भव्य बैठक, साउंड सिस्टम, लाईव्ह व स्नेह भोजन आदी नियोजनबध्द व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला सुमारे 2000 लोकांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.
अध्यक्ष विक्रम शिंदे, खजिनदार योगेश अशोक शिंदे, उपाध्यक्ष आकाश ओव्हाळ, सह खजिनदार समीर शिंदे, सचिव प्रमोद आगळे, किरण ढोरे, अभि ढोरे, विक्रम काशिद, अभिजित सोनवणे, रोहित ढोरे, गणेश शिंदे, ओंकार पिंजण आदींनी कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.