तळेगाव दाभाडे आगारात 5 नव्या एसटी बसगाड्यांचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते लोकार्पण; आमदार शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

225 views

तळेगाव दाभाडे दि.18 (प्रतिनिधी) मावळ तालुक्यातील नागरिकांना अधिक वेळेवर, सुरक्षित आणि सुटसुटीत सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने तळेगाव दाभाडे बस आगारात नव्याने दाखल झालेल्या पाच एसटी बसगाड्यांचे लोकार्पण आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते (दि.18 रविवारी) संपन्न झाले. या कार्यक्रमात स्थानिक नागरिक, आगारातील अधिकारी व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.


Author : Admin
Publisher : admin
Update : 3 months ago
Date : Sun May 18 2025

image



याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, तळेगाव दाभाडे एसटी डेपोचे व्यवस्थापक प्रमोद धायतोंडे, हरीश कोकरे, प्रकाश हगवणे, विशाल काळोखे, शैलेश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी लोकार्पणानंतर आगारातील विविध विभागांची पाहणी करत कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.


राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे मावळ तालुक्यासाठी नव्या बसगाड्यांची मागणी आमदार शेळके यांनी लेखी पत्राद्वारे केली होती. या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देत परिवहन विभागाने मावळ तालुक्याला १० नव्या बसगाड्या मंजूर केल्या असून, त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ५ गाड्यांचे लोकार्पण या वेळी करण्यात आले. उर्वरित गाड्या लवकरच उपलब्ध होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.



लोकार्पणप्रसंगी आमदार सुनील शेळके यांनी तळेगाव दाभाडे आगारातील व्यवस्थापक, चालक, वाहक, तिकीट निरीक्षक यांच्याशी चर्चा करून आगाराच्या अडचणी, सेवांमधील अडथळे, तसेच प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधा यांचा सविस्तर आढावा घेतला. बससेवा अधिक चांगल्या प्रकारे चालाव्यात यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबतही चर्चा झाली.


या नव्या बसगाड्यांमुळे तळेगाव, लोणावळा, पुणे, आंबेगाव, मुळशी परिसरातील प्रवाशांना अधिक नियमित व वेळेवर सेवा मिळणार असून, मावळातील ग्रामीण व शहरी भागांमधील दळणवळण सुलभ होणार आहे. कार्यक्रमानंतर उपस्थितांनी आमदार शेळके व परिवहन विभागाचे विशेष आभार मानले.




लेटेस्ट अपडेट्स

60 views
Image

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अतिक्रमणे काढल्यानंतर त्या भागात तातडीने रस्ते करा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आढावा बैठकीत संबधीत यंत्रणांना निर्देश

चाकण दि.8 प्रतिनिधी वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी हिंजवडीसह चाकण परिसरात काढण्यात येणाऱ्या अतिक्रमणानंतर त्या भागात तातडीने रस्ते विकसित करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने संबंधित यंत्रणांनी समन्वयातून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अपेक्षित प्रमाणात रस्त्यांचे रुंदीकरण करून रस्ते विकसित करण्याच्या दृष्टीने तातडीने पावले उचलण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आकुर्डी येथील मुख्यालयात त्यांनी चाकण भागातील वाहतूक कोंडी दूर करण्याच्या अनुषंगााने पाहणी केल्यानंतर आढावा बैठक घेतली, यावेळी ते बोलत होते.


Read More ..