817 views
तळेगाव दाभाडे दि.25 (प्रतिनिधी) हरवल्याची तक्रार देण्यासाठी गेलेल्या तरुणीचा मृतदेह तळ्यात तरंगताना आढळून आला. तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनच्या हद्दीत रविवारी (दि.24) रात्री 11:00 वा. तळेगाव दाभाडे स्टेशन येथील तळ्यात ता.मावळ जि. पुणे येथे घडली.
साक्षी कांतिकुमार भवार वय 22 रा. भीमाशंकर कॉलनी वराळे मूळ बऊर ता.मावळ असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार साक्षी भवार ही नेहमीप्रमाणे घरी न आल्याने आई व वडील तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी आले असता, पोलीसांनी मोबाईल लोकेशन वरून तपास केला असता, साक्षी तळेगाव दाभाडे स्टेशन परिसरातील तळ्याजवळ असल्याचे आढळून आले. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या पुढाकाराने रात्री 11 वाजता साक्षी भवार हिचा मृतदेह बाहेर काढला. मृत तरुणी रिलायन्स मॉल मध्ये काम करत होती.
घटनास्थळी गुन्हे पोलीस निरीक्षक प्रवीण कांबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल पाटील, पोलीस उप निरीक्षक भरत वारे आदींनी भेट दिली.
मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेहाचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
नातेवाईकांकडून घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
गुन्ह्याचा पोलीस उप निरीक्षक भरत वारे करत आहेत.