139 views
तळेगाव दाभाडे दि.15 उर्से हद्दीत शनिवारी (दि.13) 5 वर्षांच्या बालिकेला खाऊचे आमिष दाखवून अत्याचार करून खून केलेल्या आरोपीला सोमवारी दि.15 दुपारी 12 वा. वडगाव मावळ न्यायालयाने दि.24 डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी दिली.


समीरकुमार सीताराम मंडल वय 32 रा. उर्से ता.मावळ
मूळ झारखंड असे गुन्ह्यातील पोलीस कोठडीत असलेल्या आरोपीचे नाव आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार
उर्से हद्दीत शनिवारी दि.13 सायंकाळी 6:45 वा. आरोपी समीरकुमार मंडल याने बालिकेला खाऊचे आमिष दाखवून घरापासून शेतात नेऊन अत्याचार केला. त्या बालिकेच्या लेगीजने तिचा गळा आवळून खून केला. रात्री त्या बालिकेचे आई वडील शोध घेत असता, बालिकेच्या भावाने आरोपीला ओळखल्याने आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे dcp विशाल गायकवाड, शिवाजी पवार, acp विशाल हिरे, बाळासाहेब कोपणार यांच्या मार्गदर्शनाखाली Psi प्रकाश पारखे, नईम शेख, महेंद्र सपकाळ, अशोक केंद्र, पोलीस अंमलदार सचिन काचोळे, सुधीर वाडीले, दिलीप राठोड, आदींनी आरोपीला ताब्यात घेतले.
या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल पाटील करत आहेत.
मावळ तालुक्यातील अनेक संघटनांनी निषेध व्यक्त केला असून आमदार सुनील शेळके यांनी आरोपीला फाशीच होण्याची मागणी केली. घर मालकांनी भाडेकरूंची माहिती पोलीस स्टेशन देण्याच्या तसेच परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत सूचना दिल्या.