कंटेनर बस स्टॉपमध्ये घुसला; महिला ठार तर तीन विद्यार्थ्यांसह एक व्यक्ती गंभीर जखमी

2908 views

वडगाव मावळ दि.19 (प्रतिनिधी) भरधाव कंटेनर बस स्टॉपमध्ये घुसल्याने भीषण अपघात झाला, या महिला जागीच ठार तर तीन विद्यार्थी गंभीर जखमी दुचाकीस्वार सुदैवानं वाचला. हा अपघात बुधवारी (दि.18) सकाळी 8:45 वा. मुंबई-पुणे महामार्ग कुडे वाडा वडगाव नगरपंचायत ता.मावळ हद्दीत घडला.


Author : Admin
Publisher : admin
Update : 1 month ago
Date : Wed Jun 19 2024

imageकंटेनर

वडगाव मावळ दि.19 (प्रतिनिधी) भरधाव कंटेनर बस स्टॉपमध्ये घुसल्याने भीषण अपघात झाला, या महिला जागीच ठार तर तीन विद्यार्थ्यांसह एक व्यक्ती गंभीर जखमी दुचाकीस्वार सुदैवानं वाचला. हा अपघात बुधवारी (दि.18) सकाळी 8:45 वा. मुंबई-पुणे महामार्ग कुडे वाडा वडगाव नगरपंचायत ता.मावळ हद्दीत घडला.


लता रणजित जाधव (वय 41 रा. कुडे वाडा वडगाव मावळ) अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

सृष्टी राजेंद्र भाटेकर (वय 15 रा. केशवनगर वडगाव नगरपंचायत, मृदुल संतोष भवार (वय 14) मैत्रिय संतोष भवार (वय 11) व संदीप पिरणसिंह झालटे (वय 40) तिघे रा. दिग्विजय कॉलनी वडगाव नगरपंचायत) गंभीर जखमी आहेत. 


पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार कुडेवाडा बस स्टॉपवर नेहमीप्रमाणे महिला, विद्यार्थी व नागरिक थांबले होते. सकाळी 8:45 वा. मुंबई बाजूकडून पुणे बाजूला जाणारा भरधाव एम एच 46 बी एफ 9157 कंटेनर बस स्टॉप मध्ये घुसला यात महिला लता जाधव हिचा जागीच मृत्यू झाला. शाळेला जाणारे तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले. विद्यार्थ्यांवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. यात दुचाकीस्वार बचावला.

घटनास्थळी वडगाव मावळ पोलीस निरीक्षक कुमार कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड व पोलिसांनी कंटेनर बाजूला केला. बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती.


या मृत महिलेच्या पतीचे निधन कोरोनामध्ये झाले. दोन मुली व मुलगा असे कुटुंब असून महिला उदरनिर्वाहासाठी कामाला जात असताना, अपघात झाला परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


मुळातच मुंबई-पुणे महामार्गालगत असलेल्या कुडेवाडा येथे मृत्यूचा सापळा झाला आहे. याच ठिकाणी अनेक अपघात होऊन अनेकांचे बळी गेले आहेत वारंवार कुडे वाडा येथे अपघात नियंत्रण ठेवण्यासाठी स्वयंचलित सिग्नल, गतिरोधक, रस्ता रुंदीकरण सर्वात महत्त्वाचे उड्डाण पूल होण्याची मागणी केली जात आहे.

एम एस आर डी सी व आय आर बी बघ्याची भूमिका घेत आहे. आणखी किती नागरिकांच्या बळींची प्रतीक्षा प्रशासन करत आहे. वडगाव नगरपंचायत वाढते नागरीकरण त्यांना सुरक्षित प्रवास करण्यासाठी उपाययोजना कधी करणार असा सवाल केला जात आहे. आता तर प्रशासनाला जाग येणार का ?

मुंबई-पुणे महामार्गावरव नुसते टोल नाके त्यांची दैनंदिन वाहतूक कोंडी, अरूंद दुभाजक व ब्लॅक स्पॉट हा प्रश्न सुटणार कधी ?

लेटेस्ट अपडेट्स