शिरोता वनपरिक्षेत्र अधिकारी पदी सोमनाथ ताकवले यांची नियुक्ती

900 views

वडगाव मावळ दि.16 (प्रतिनिधी) मावळ शिरोता वनपरिक्षेत्र अधिकारी पदी सोमनाथ ताकवले यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी त्यांच्या पदाचा कार्यभार बुधवारी (दि.16) स्वीकारला आहे.


Author : Admin
Publisher : admin
Update : 1 year ago
Date : Wed Oct 16 2024

imageवनपरिक्षेत्र अधिकारी



मावळ तालुक्यातील शिरोता वनपरिक्षेत्र अधिकारी सुशील मंतावार यांची सहाय्यक वनसंरक्षक वाशीम येथे पदोन्नती बदली झाली त्या रिक्त जागेवर सामाजिक वनीकरण सातारा येथून शासन आदेशानुसार सोमनाथ ताकवले यांची नियुक्ती करण्यात आली.


 पुणे वनपरिक्षेत्र अधिकारी एस डी वरक यांच्याकडे शिरोता वनपरिक्षेत्र कार्यालयाचा अतिरिक्त कार्यभार होता. त्यांच्याकडून ताकवले यांनी कार्यभार स्वीकारला.



 वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ ताकवले यांनी मावळ तालुक्यात वडगाव मावळ वनपरिक्षेत्र कार्यालयात 5 वर्ष सेवा केली आहे. वडगाव मावळ वनपरिक्षेत्रात काम करत असताना त्यांनी कोरोना कालावधीत  महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत पारवडी रोपवाटिकेत रोप निर्मितीची उल्लेखनीय काम केली होती. तसेच दोन ठिकाणच्या बिबट मादी पिलांचे पुनर्मिलनाचे यशस्वी काम केले होते. रानडुक्कर शिकारीतील आरोपींना ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर करणे व वनवणव्यातील आरोपींना ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर करणे, टायगर पॉईंट लायन्स पॉईंट येथील वन पर्यटनातून विविध विकास कामे केली व रोजगार निर्मिती केली, वनविभागात विविध योजना अंतर्गत जल व मृदूसंधारण काम केली, उच्च न्यायालयात खाजगी वना संदर्भातील करण्यात आलेल्या रीट पिटीशन संदर्भात पाठपुरावा करून शासनाची बाजूने निकाल लावण्यात यश महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. तसेच सातारा येथे सामाजिक वनीकरण विभागात कार्यरत असताना महात्मा गांधी ग्रामीण रोजगार.




"वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ ताकवले म्हणाले वन व वन्यजीव संरक्षण, मानव वन्यजीव संघर्ष याबाबत जागृती तसेच जनतेचे वनविभागाशी निगडित प्रश्न सोडवणे, एकविरा देवीचा वन पर्यटन आराखडा बाबत पाठपुरावासह अंमलबजावणी करणार."




लेटेस्ट अपडेट्स

464 views
Image

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नूतन वास्तूचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते; 761 कोटी 17 लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ!

तळेगाव दाभाडे दि.19 (प्रतिनिधी) मावळ तालुक्याच्या विकासाचा नवा अध्याय सोमवार, दि. 20 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता लिहिला जाणार आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते शिवशंभू तीर्थ मैदान, तळेगाव येथे संपन्न होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त एकूण 761 कोटी 17 लाख रुपयांच्या लोकार्पण व भूमिपूजनाच्या कामांचा शुभारंभ होणार असल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली.


Read More ..