1478 views
वडगाव मावळ दि.18 (प्रतिनिधी) गोडुंब्रे ग्रामपंचायतीच्या सरपंच निशा गणेश सावंत यांनी सरकारी जागेत अतिक्रमण केल्याने त्यांचे सदस्य पद रद्द केल्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दि.10/09/24 यांनी दिला आहे. शुक्रवारी (11 ऑक्टोबर) ला आदेश अर्जदार व जाब देणार यांना देण्यात आला आहे.
अर्जदार कल्पना हेमंत सावंत रा.गोडुंब्र ता. मावळ यांनी सरपंच निशा गणेश सावंत गोडुंब्रे ता. मावळ, जि. पुणे यांनी दि. 10/01/2023 रोजीच्या अर्जाद्वारे, ग्रामपंचायत गोडुंब्रे, ता. मावळ, जि. पुणे येथील लोकनियुक्त सरपंच निशा गणेश सावंत यांनी सरकारी जागेत अतिक्रमण केल्यामुळे त्यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 14(1) (ज-3) अन्वये अपात्र करणे बाबत विवाद अर्ज दाखल केलेला आहे. सदर विवाद अर्जाच्या अनुषंगाने प्रस्तुत प्रकरणी सर्व संबंधितांना नोटीसा काढून सुनावणी निश्चित करुन अर्जदार व जाबदेणार यांना त्यांचे म्हणणे मांडणेसाठी पुरेशी संधी देण्यात आलेली आहे.
सदर विवाद अर्जाबाबत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 16 (2) अन्वये मा. जिल्हाधिकारी पूणे यांनी दि. 10/09/2024 रोजी खालील प्रमाणे आदेश दिलेला आहे.
निकालपत्रात दिलेल्या कारणास्तव जाब देणार निशा गणेश सावंत यांना ग्रामपंचायत गोडुंब्रे, ता. मावळ, जि.पुणे येथील ग्रामपंचायत सरपंच व सदस्य पदी राहण्यास अपात्र ठरविण्यात येत आहे.
हा आदेश मावळ तहसीलदार, मावळ गटविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे व ग्रामसेवक गोडुंब्रे यांना देण्यात आली आहे.
अर्जदार कल्पना सावंत यांच्या वतीने ऍड अमित आव्हाड, ऍड सोपान मुंडे व ऍड योगेश गराडे यांनी काम पाहिले.