मोबाईल नंबर न दिल्याने विवाहित महिलेला चाकूने भोकसले

1993 views

वडगाव मावळ दि.17 (प्रतिनिधी) विवाहित महिलेने मोबाईल नंबर न दिल्याच्या रागातून आरोपीने महिलेच्या पोटात चाकू भोसकून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी (दि.17) सकाळी 8 वा. कान्हे-जांभूळ महिंद्रा cie कंपनीच्या गेट समोर मोकळ्या जागेत ता.मावळ जि. पुणे हद्दीत घडली. कलम 307, 506 अन्वये वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. जखमी महिलेवर वैद्यकीय उपचार सुरू


Author : Admin
Publisher : admin
Update : 1 year ago
Date : Mon Jun 17 2024

imageफोटो

वडगाव मावळ दि.17 (प्रतिनिधी) विवाहित महिलेने मोबाईल नंबर न दिल्याच्या रागातून आरोपीने महिलेच्या पोटात चाकू भोसकून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी (दि.17) सकाळी 8 वा. कान्हे-जांभूळ महिंद्रा cie कंपनीच्या गेट समोर मोकळ्या जागेत ता.मावळ जि. पुणे हद्दीत घडली. कलम 307, 506 अन्वये वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. जखमी महिलेवर वैद्यकीय उपचार सुरू.


लक्ष्मी माताप्रसाद वाल्मिकी वय 25 रा. जांभूळ ता.मावळ मुळगाव देवगाव ता.कोच जि. जालोन उत्तर प्रदेश जखमी महिलेचे नाव आहे.


संतोष मारुती लगली वय 43 रा.जांभूळ ता.मावळ आरोपीचे नाव आहे.




पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी जखमी महिला लक्ष्मी वाल्मिकी व आरोपी संतोष लगली महिंद्रा cie कंपनीच्या कँटीन मध्ये एकत्रित काम करत आहेत. आरोपी संतोष लगली हा फिर्यादी लक्ष्मी वाल्मिकी कडे तिचा मोबाईल नंबर ची वारंवार मागणी करत होता. परंतु फिर्यादीने आरोपीला नकार दिला होता. याचाच मनात राग धरून सोमवारी (दि.17) सकाळी 8 वा. कान्हे-जांभुळ येथील महिंद्रा CIE कंपनीचे गेट समोरील मोकळ्या जागेत आरोपी संतोष लगली याने फिर्यादीच्या पोटावर चाकुने भोसकून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. जखमी महिलेवर सोमाटणे फाटा येथील पवना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

घटनास्थळी लोणावळा उप विभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक, पोलीस निरीक्षक कुमार कदम आदींनी भेट दिली. आरोपीला वडगाव मावळ पोलिसांनी अटक केली. मंगळवारी (दि.18) सकाळी वडगाव मावळ न्यायालयात हजर करणार आहेत.

या गुन्ह्याचा तपास पोलीस उप निरीक्षक सांगळे करत आहेत.




लेटेस्ट अपडेट्स

146 views
Image

*PMRDA क्षेत्रातील नियमबाह्य गृहप्रकल्पांवर कारवाईसाठी १५ दिवसांची अंतिम मुदत*

मुंबई दि.11 (प्रतिनिधी) PMRDA क्षेत्रातील नियमबाह्य गृहप्रकल्पांवर कारवाईसाठी अखेर १५ दिवसांची अंतिम मुदत जाहीर करण्यात आली असून, विधानसभेचे उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या फेरआढावा बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देण्यात आले. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा केला होता. नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने शेळके यांच्या प्रयत्नांना अखेर यश लाभले आहे.


Read More ..