313 views
वडगाव मावळ दि.8 (प्रतिनिधी) देवले येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मावळचे आमदार सुनील शेळके, पीएमआरडीए सदस्य दीपाली हुलावले यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष सुवर्णा राऊत यांच्या निवडीबद्दल विद्यार्थ्यांना शालेय वस्तू व खाऊ वाटप तसेच गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा सन्मान कार्यक्रमाचे आयोजन दि.4 जुलै रोजी करण्यात आले. या कार्यक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.
वडगाव मावळ दि.8 (प्रतिनिधी) देवले येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मावळचे आमदार सुनील शेळके, पीएमआरडीए सदस्य दीपाली हुलावले यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष सुवर्णा राऊत यांच्या निवडीबद्दल विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत सदस्य उर्मिला विनायक आंबेकर यांच्या वतीने शालेय वस्तू व खाऊ वाटप तसेच गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा सन्मान कार्यक्रमाचे आयोजन दि.4 जुलै रोजी करण्यात आले. या कार्यक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.
यावेळी राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष सुवर्णा राऊत व पीएमआरडीए सदस्य दीपाली हुलावले यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष सुवर्णा राऊत, उपसरपंच कुसगाव खुर्द दीपाली लालगुडे, उमा शेळके, मनिषा आंबेकर, देवले सरपंच वंदना आंबेकर, पोलीस पाटील सीमा राहुल आंबेकर, सामाजिक कार्यकर्ते किरण यादव, उप सरपंच सोनाली गायकवाड, माजी उप सरपंच जयश्री गाडे, सदस्य आशा आंबेकर, शिक्षिका स्मिता कुलकर्णी, मनिषा दरेकर, अनिता केदारी, ललिता जाधव, मदतनीस नंदा गाडे, उषा चतुर, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मनिषा दरेकर यांनी केले. आभार ग्रामपंचायत सदस्य उर्मिला विनायक आंबेकर यांनी मानले.