विजेच्या शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत युवक व बालकाचा मृत्यू

1642 views

वडगाव मावळ दि.8 (प्रतिनिधी) विजेच्या शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत युवक व बालक भाजल्याने उपचार दरम्यान मृत्यू झाला. ही घटना दि.30 जून 2025 सायंकाळी 7:15 वा. कोथुर्णे ता.मावळ हद्दीत घडली. यात दुकानातील फ्रीज, फॅन, टेबल व किराणा माल असे 2 लाखाचे साहित्य जळून खाक झाले.


Author : Admin
Publisher : admin
Update : 3 days ago
Date : Tue Jul 08 2025

image

वडगाव मावळ दि.8 (प्रतिनिधी) विजेच्या शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत युवक व बालक भाजल्याने उपचार दरम्यान मृत्यू झाला. ही घटना दि.30 जून 2025 सायंकाळी 7:15 वा. कोथुर्णे ता.मावळ हद्दीत घडली. यात दुकानातील फ्रीज, फॅन, टेबल व किराणा माल असे 2 लाखाचे साहित्य जळून खाक झाले.

गणेश तुकाराम दळवी वय 19 व विराज सचिन दळवी वय 12 रा. कोथुर्णे ता.मावळ असे आगीत भाजल्याने मृत्यू झालेल्या युवक व बालकाचे नाव आहे.


दुकानामध्ये गणेश दळवी व विराज दळवी बसले असता, अचानक विजेच्या शॉर्ट सर्किटने दुकान आग लागली. यात गणेश दळवी व विराज दळवी आगीत भाजल्याने त्यांना सुर्या सह्याद्री हॉस्पिटल कसबा पेठ पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यात उपचारादरम्यान गणेश दळवी याचा गुरुवार (दि.3) सायंकाळी 7 वा. मृत्यू झाला. विराज दळवी याचा रविवारी (दि.6) रात्री 10:30 वा. उपचारादरम्यान मृत्यू झाला. 


विराज दळवी हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोथुर्णे येथे सहावी वर्गात शिकत होता, तो अतिशय मनमिळाऊ बोलका होता.

गणेश दळवी याचा आयटीआय झाला होता घराला हातभार लावत होता. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पुढील तपास कामशेत पोलीस करत. शासनाकडून योग्य ती मदत दळवी कुटुंबाला मिळण्याची मागणी परिसरातून केली जात आहे.




लेटेस्ट अपडेट्स

145 views
Image

*PMRDA क्षेत्रातील नियमबाह्य गृहप्रकल्पांवर कारवाईसाठी १५ दिवसांची अंतिम मुदत*

मुंबई दि.11 (प्रतिनिधी) PMRDA क्षेत्रातील नियमबाह्य गृहप्रकल्पांवर कारवाईसाठी अखेर १५ दिवसांची अंतिम मुदत जाहीर करण्यात आली असून, विधानसभेचे उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या फेरआढावा बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देण्यात आले. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा केला होता. नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने शेळके यांच्या प्रयत्नांना अखेर यश लाभले आहे.


Read More ..