माजी सरपंच पोपटराव वहिले यांचे निधन

444 views

वडगाव मावळ दि.31 (प्रतिनिधी) वडगाव ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच पोपटराव मारुती वहिले (वय 86) यांचे शुक्रवार (दि 28) निधन झाले.


Author : Admin
Publisher : admin
Update : 1 month ago
Date : Mon Mar 31 2025

imageपोपटराव वहिले

पोपटराव वहिले यांनी मावळ तालुका देखरेख संघाचे अध्यक्षपदही भूषविले होते. वडगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सलग 25 वर्षे चेअरमनपदी होते.

त्यांच्यामागे दोन मुले, भाऊ, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे.


कामगार नेते प्रमोद वहिले व राष्ट्रीय खेळाडू शैलेश वहिले यांचे ते वडील होत तर वडगाव विकास सोसायटीचे चेअरमन किसनराव वहिले यांचे ते बंधू होत. आज शुक्रवारी (दि.28) रोजी सायंकाळी 6 वाजता वैकुंठ स्मशानभूमी, वडगाव मावळ येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे. रविवार दि.6/4/25 सकाळी 8 वाजता दशक्रिया विधी होणार आहे. त्यानिमित्ताने ह. भ. प. चंद्रकांत महाराज वांजळे यांचे प्रवचन होईल.




लेटेस्ट अपडेट्स