लोणावळ्यात ठाकरे गटाला धक्का; माजी नगरसेविका,उपशहरप्रमुखांचा शिवसेनेत प्रवेश

24 views

वडगाव मावळ दि.28 (प्रतिनिधी) ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून ज्येष्ठ माजी नगरसेविका कल्पना आखाडे, नगरसेविका सिंधूताई परदेशी यांच्यासह उपशहरप्रमुख, विविध पदाधिका-यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना उपनेते, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सर्वांचे शिवबंधन बांधून सर्वांचे पक्षात स्वागत केले. सर्वांना सन्मानाची वागणूक मिळेल अशी ग्वाही दिली.


Author : Admin
Publisher : admin
Update : 5 days ago
Date : Mon Apr 28 2025

image




यावेळी शिवसेना महिला उपनेत्या सुलभा उबाळे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शरदराव हुलावळे , युवा सेना उपजिल्हाप्रमुख दत्ताभाऊ केदारी, शिवसेना मावळ तालुकाप्रमुख राजाभाऊ खांडभोर, युवासेना पुणे जिल्हा समन्वय सागर पाचरणे, शिवसेना उप तालुका प्रमुख राम सावंत, शिवसेना लोणावळा शहर प्रमुख संजय भोईर, शिवसेना महिला लोणावळा शहर संघटिका मनीषाताई भांगरे, शिवसेना मावळ विधानसभा समन्वयक अंकुश देशमुख, शिवसेना उपशहर प्रमुख प्रकाश पाठारे, शिवसेना लोणावळा समन्वयक नंदू कडू, विशाल पाठारे उपस्थित होते.


ठाकरे गटाच्या ज्येष्ठ नगरसेविका कल्पनाताई आखाडे, नगरसेविका सिंधूताई परदेशी,उबाठा गटाचे लोणावळा उपशहर प्रमुख प्रकाश पाठारे, विजय खाडे, सह शहर संघटिका प्रियाताई पवार, विभाग संघटिका अनिताताई गायकवाड, विभाग संघटिका माग्रेट मुन्नास्वामी, विभाग प्रमुख मंगेश येवले, उपविभाग प्रमुख अनिल कालेकर, कल्पेश तीखे, दुर्वेश कडू, प्रणव तिकोने, संकेत जाधव, आदित्य शिंदे, दुर्वेश बोडके, प्रथमेश पाठारे यांच्यासह गंगाबाई हवालदार, अश्विनी सोपान पुनावडे, शुभम कदम , रोहित चिलवंत, सूरज भोईर, सागर दसवते, सौरभ गावडे, पियुष राजगुडे यांनी शिवसेनेते प्रवेश केला.

खासदार बारणे म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेहमी कार्यकर्त्यांसाठी उपलब्ध असतात. कार्यकर्त्यांना न्याय, ताकद देतात. त्यांच्या सुख, दुखात सहभागी होता. त्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेऊन ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करत आहेत. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जात आहे. महायुतीचे सरकार जनहिताचे निर्णय घेत आहे. सरकारचे निर्णय शिवसैनिकांनी जनतेपर्यंत पोहचविले पाहिजेत. आज शिवसेनेत प्रवेश केलेल्या सर्व पदाधिका-यांना सन्मानाची वागणूक दिली जाईल. कोणावर अन्याय होऊ दिला जाणार नाही. सर्वांनी मिळून पुणे जिल्ह्यात शिवसेनेचे संघटन अधिक मजबूत करायचे आहे.




लेटेस्ट अपडेट्स