वडगाव नगरपंचायतीच्या स्वागत कमानीवरील नाव बेकायदेशीर असल्याची नागरिकांची मागणी

484 views

वडगाव मावळ दि.17 (प्रतिनिधी) येथील वडगाव नगरपंचायतीच्या मुख्य रस्त्यावर उभारण्यात आलेली स्वागत कमानीवर जे नाव आहे ते कुठल्याही प्रकारचे ठराव व नागरिकांना विश्वासात न घेता टाकले आहे ते काढण्यात यावे असे लेखी निवेदन शुक्रवारी (दि.15) वडगाव नगरपंचायतीचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांना देण्यात आले.


Author : Admin
Publisher : admin
Update : 20 hours ago
Date : Sat May 17 2025

image


याप्रसंगी बाळासाहेब कृष्णराव ढोरे, किसनराव वहिले, प्रकाशराव कुडे, राजेंद्र कुडे, पंढरीनाथ राजाराम ढोरे, मयुर प्र. ढोरे, बापुसाहेब वाघवले, मनोज खं. ढोरे, चंदुकाका ढोरे राहुल ढोरे, अर्जुन ढोरे, आबा चव्हाण, सुरेश जांभूळकर, राजेंद्र वहीले, भाऊसाहेब तु. ढोरे, बाळासाहेब तुमकर, सुनील कोद्रे, नितीन चव्हाण, सचिन कडू, सागर ढोरे, गणेश अ. ढोरे, अमोल श्री. ढोरे व आदी नागरिकांनी स्वागत कमानी वरील नाव काढण्याची मागणी केली आहे.


निवेदनात मध्ये असे नमूद केले आहे की आम्ही वडगावचे नागरिक असुन, वडगाव नगरपंचायतची स्वागत कमान जुना मुंबई-पुणे राष्ट्रीय माहामार्ग १२६ यावर उभी आहे हि स्वागत कमान वडगाव गावाच्या पूर्वेस, वडगाव फाटा म्हणजे गावातील अक्षय हॉटेल या ठिकाणी आहे. आता वडगाव नगरपंचायत कमान मुळ स्टक्चर मध्ये व स्वागत कमानीवरील नावात बदल करण्यात आले आहे. याबाबत गावातील नागरिकांना याबाबत कोणतीही पुर्व माहिती नाही. सदर वडगाव नागरिकांचा व आमचा असा आरोप आहे कि, संबधित अधिकारी यांनी मनमानी कारभार करून कोणतीही निविदा प्रकिया न करता, आर्थिक फायदयासाठी देवाणघेवाण करून वडगाव नगरपंचायत स्वागत कमानमध्ये फेरबदल करून वडगांव नगरपंचायत स्वागत कमानीवरील नावात देखील बदल करण्यात आला आहे असे दिसत आहे. वडगाव नगरपंचायतने स्वागत कमानीवरील नाव बदल करण्यास कोणता ठराव अथवा परवानगी घेतली नाही या सर्व बाबींची माहीती वडगावचे नागरिक म्हणून नागरिकांना देण्यात आलेली नाही. आमच्या निदर्शनात वडगाव नगरपंचायतने खालीलपैकी कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली नाही असे दिसत आहे.


१) नगरपंचायतकमान व नावातबदल करण्यात आलेला ठराव

२) अदाज प्रत्रक

३) टी एस तांत्रिक मंजुरी

४) संबधित कामाची निविदा वर्तमानपत्रात दिलेली जाहीरात

५) नगरपंचायतने यावार केलेला खर्च माहीती

६) संबधित ठेकेदाराची माहीती


वडगाव नगरपंचायतकडे याची माहीती विचारणा केली असता सार्वजनिक बाधकाम विभागाकडे जाऊन विचारणा करा अशी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत परंतु ही वडगाव नगरपंचायत स्वागत कमान वडगाव कातवी ग्रामपंचायत बरखास्त झाली व त्यानंतर वडगाव नगरपंचायत स्थापनेनंतर यावर वडगाव नगरपंचायतने खर्च केला आहे अशी माहीती मिळत आहे त्यामुळे वडगाव नगरपंचायत स्वागतकमान यावर पुर्ण अधिकार हा वडगाव नगरपंचायतचाच आहे वडगावचे ग्रामस्थ म्हणून आमचा असा आरोप आहे कि यामध्ये कुठेतरी वडगाव नगरपंचायत संबंधित काही स्थानिकांना हाताशी धरून वडगाव नगरपंचायत स्वागतकमानी वरील नावात बदल करून, आर्थिक घोटाळा व भ्रष्टाचार केला आहे.


यावेळी वडगांव नगरपंचायतीचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ निकम यांनी यामध्ये लक्ष घालून संबधित अधिकारी यांच्यावर योग्य ती कारवाई करून वडगाव नगरपंचायत स्वागत कमान पूर्ववत करावे असे ग्रामस्थांनी सांगितले आहे.

वडगांव नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी प्रवीण निकम यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पत्र व्यवहार करू योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले.


वडगाव नागरिकांनी सांगितले की पुर्वेकडील कमानीला ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज यांचे नाव देण्यात यावे व पश्चिमेस असलेल्या कमानीला श्रीमंत सरदार महाजी शिंदे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.




लेटेस्ट अपडेट्स

8 views
Image

संघटनेसाठी दररोज एक तास द्या, ताकत देऊ उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या कार्यकर्त्यांना सूचना

पिंपरी दि.15 (प्रतिनिधी) पूर्वी एका रात्रीत सभासद नोंदणी केली जात होती. समोरचे नेतृत्व ही नोंदणी कशी झाली हे बघणारे नव्हते. आताचे नेतृत्व संघटना कशी वाढविली जाते हे डोळसपणे बघणारे आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः लक्ष ठेवून सभासद नोंदणी करून घेत आहेत. नोंदणीची पडताळणी करत आहेत.काम करणारे आणि काम चुकार कार्यकर्ते हे आम्हाला ओळखता येते. त्यामुळे संघटनेसाठी दररोज एक तास द्यावा. ताकत देण्याचे काम आमच्याकडून केले जाईल, अशी ग्वाही उद्योगमंत्री, पुणे जिल्ह्याचे संपर्क नेते उदय सामंत यांनी दिली.


Read More ..