रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

733 views

वडगाव मावळ दि.2 (प्रतिनिधी) एक्सप्रेस रेल्वेच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.2) सकाळी 11 वा. वडगाव रेल्वे स्टेशनजवळ घडली.


Author : Admin
Publisher : admin
Update : 3 months ago
Date : Mon Jun 02 2025

image

वडगाव मावळ दि.2 (प्रतिनिधी) एक्सप्रेस रेल्वेच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.2) सकाळी 11 वा. वडगाव रेल्वे स्टेशनजवळ घडली.



गणेश चंद्रकांत पराठे वय 30 रा. आहिरवडे फाटा कृष्णा टेम्पल साते ता.मावळ असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

लोहमार्ग पोलीस सतीश खराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई पुणे जाणाऱ्या उद्यान एक्सप्रेस रेल्वेची धडक बसून गणेश पराठे हा गंभीर जखमी झाल्याने जागीच मयत झाला.


घटनास्थळी आरपीएफ तळेगाव दाभाडे सुनील चांदणे, लोहमार्ग पोलीस सतीश खराडे व केकेआर रुग्णवाहिका चालक पिंटू मानकर यांनी मृतदेह पंचनामा करून शवविच्छेदन करण्यासाठी तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्रात रवाना केला. मृतदेह नातेवाईकांची ताब्यात दिला. पुढील तपास तळेगाव दाभाडे लोहमार्ग पोलीस करत आहेत.




लेटेस्ट अपडेट्स