मावळ न्यायालयासाठी १०९ कोटी उभी राहणार नवीन भव्य इमारत – आमदार सुनील शेळके

563 views

वडगाव मावळ दि.12 (प्रतिनिधी) मावळ तालुक्याच्या न्यायव्यवस्थेच्या इतिहासात सुवर्णपान कोरणारा महत्वाचा टप्पा वडगाव मावळ येथे नोंदवला गेला. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय, वडगाव मावळ येथे न्यायमूर्ती, वरिष्ठ वकील व बार असोसिएशन यांची संयुक्त बैठक आमदार सुनील शंकरराव शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.


Author : Admin
Publisher : admin
Update : 3 months ago
Date : Fri Sep 12 2025

image


या बैठकीत नागरिकांच्या न्यायप्रवेशासाठी दीर्घकाळापासूनची उणीव भासत असलेल्या भव्य न्यायालयीन वास्तू उभारणीचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. कृषी विभागाच्या जागेवर उभारण्यात येणारी ही इमारत पुढील ५० वर्षांचा विचार करून आधुनिक व अत्याधुनिक सुविधांसह बांधली जाणार आहे

या भव्य इमारतीमुळे वडगाव मावळ व परिसरातील नागरिकांना त्वरित, सुलभ व पारदर्शक न्याय मिळविण्याचा मार्ग सुकर होणार आहे. विशेषत: ग्रामीण व दुर्बल घटकांनाही न्याय मिळविण्यात आत्मविश्वास निर्माण होईल, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

न्यायालयीन कामकाजात कार्यक्षमता वाढविणे, वकिलांना योग्य सुविधा उपलब्ध करणे आणि सर्वसामान्यांना न्यायालयीन वातावरणात सहज प्रवेश मिळावा हा या प्रकल्पामागील मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

या बैठकीस न्यायमूर्ती श्री. डी. के. अनभुले, श्री. आर. व्ही. हुद्दार, श्री. एस. बी. काळे, श्री. एस. एस. देशमुख, श्री. एस. जी. दुबाळे, श्री. ए. एम. विभूते, श्री. एस. पी. जाधव, श्री. व्ही. आर. डोईफोडे, श्री. एस. ए. माळी, श्री. के. ए. देशपांडे, तसेच ज्येष्ठ वकील व वडगाव मावळ बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रतापराव शेलार, लीगल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षा अ‍ॅड. श्रीमती रंजनाताई भोसले यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते. मावळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासोबतच सामाजिक न्यायप्रणाली सक्षम करण्यासाठी आमदार सुनील शेळके सतत प्रयत्नशील आहेत. न्यायालयीन इमारतीच्या उभारणीचा निर्णय हा त्यांच्या दूरदृष्टीचा व समाजाप्रती असलेल्या बांधिलकीचा ठोस पुरावा ठरतो.


त्यांच्या पुढाकारामुळे न्यायालयीन कामकाजासाठी आवश्यक निधी, सुविधा व नियोजन योग्य पद्धतीने पार पडेल, अशी खात्री यावेळी व्यक्त करण्यात आली. या निमित्ताने वडगाव मावळ न्यायालयाला भविष्यातील न्यायनगरी बनविण्याचा मार्ग खुला झाला आहे.

या बैठकीत घेतलेला निर्णय मावळ तालुक्याच्या न्यायनगरीसाठीच नव्हे, तर संपूर्ण पुणे जिल्ह्यासाठी ऐतिहासिक व दूरगामी परिणाम घडवणारा ठरणार आहे. न्यायाच्या दारी प्रत्येक नागरिक सहज पोहोचेल, अशी नवी दृष्टी या उपक्रमातून साकार होणार आहे.




लेटेस्ट अपडेट्स

903 views
Image

मावळच्या 4 तहसीलदारांसह 10 अधिकाऱ्यांचे निलंबन ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा: मंगरूळ येथे 90 हजार ब्रास जास्त उत्खनन

नागपूर दि.13 (प्रतिनिधी) पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात वनीकरणासाठी राखीव असलेल्या क्षेत्रात तब्बल 90 हजार ब्रास अनधिकृत गौण खनिज उत्खनन झाल्याचे निष्पन्न झाल्याने महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी (दि.12) या घोटाळ्यात दोषी आढळलेले चार तहसीलदार, चार मंडळ अधिकारी आणि दोन तलाठी अशा दहा जणांना निलंबित करण्याचे निर्देश दिले. परवानगीपेक्षा जास्त उत्खनन केल्याने दोषीवर फौजदारी व महसुली अधिनियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.


Read More ..
197 views
Image

मावळात मल्टिनॅशनल कंपन्यांची कोट्यवधींची फसवणूक; दलालांची होणार चौकशी

नागपूर दि.9 (प्रतिनिधी) मावळ तालुक्यात गुंतवणुकीसाठी येणाऱ्या मल्टिनॅशनल कंपन्यांची काही दलालांकडून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले असून, याबाबत गंभीर आरोप आमदार सुनील शेळके यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात केले आहेत. हुंदाईसारखी कोरियन कंपनी महाराष्ट्रात आणणाऱ्या महायुती सरकारचा उद्देश रोजगारनिर्मिती असताना, काही दलालांनी कंपनीच्या व्हेंडरना बेकायदेशीर व फसवे दस्तऐवज दाखवून मिळकतीची विक्री करून आंतरराष्ट्रीय कंपनीलाच आर्थिक गंडा घातला, असे त्यांनी स्पष्ट केले.


Read More ..
724 views
Image

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नूतन वास्तूचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते; 761 कोटी 17 लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ!

तळेगाव दाभाडे दि.19 (प्रतिनिधी) मावळ तालुक्याच्या विकासाचा नवा अध्याय सोमवार, दि. 20 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता लिहिला जाणार आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते शिवशंभू तीर्थ मैदान, तळेगाव येथे संपन्न होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त एकूण 761 कोटी 17 लाख रुपयांच्या लोकार्पण व भूमिपूजनाच्या कामांचा शुभारंभ होणार असल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली.


Read More ..