अनैतिक संबंधातून 23 वर्षीय तरुणाचा खून; कान्हे आंबेवाडीची घटना खुनातील आरोपी अटक

17998 views

वडगाव मावळ दि.1 (प्रतिनिधी) अनैतिक संबंधातून एका आरोपीने 23 वर्षीय तरुणावर कोयत्याने डोक्यात चेहऱ्यावर पाठीवर व इतर ठिकाणी वार करून खून केला. ही घटना मंगळवारी (दि.1) रात्री 7:45 वा. शनि मंदिराजवळ आंबेवाडी कान्हे ता. मावळ जि.पुणे येथे घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.


Author : Admin
Publisher : admin
Update : 1 month ago
Date : Wed Apr 02 2025

imageमयत आरोपी


वडगाव मावळ दि.1 (प्रतिनिधी) अनैतिक संबंधातून तीन आरोपीने 23 वर्षीय तरुणावर कोयत्याने डोक्यात चेहऱ्यावर पाठीवर व इतर ठिकाणी वार करून खून केला. ही घटना मंगळवारी (दि.1) रात्री 7:45 वा. शनि मंदिराजवळ आंबेवाडी कान्हे ता. मावळ जि.पुणे येथे घडली.

या घटनेने परिसरात खळबळ उडाली काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. उमेश हरिभाऊ सातकर वय 53 रा. आंबेवाडी कान्हे ता.मावळ यांनी वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली.


वैभव उमेश सातकर वय 23 रा. आंबेवाडी कान्हे ता मावळ असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.


अंकुश जयवंत सातकर (वय 42 रा. आंबेवाडी कान्हे ता मावळ) ,

सोपान रामचंद्र खेंगले (वय 65 रा. निगडे ता.मावळ जि.पुणे) एक अल्पवयीन असे खुनातील आरोपींची नावे आहेत.

वडगाव पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार मयत वैभव सातकर व आरोपी अंकुश सातकर दोघे शेजारी राहत असून मयत वैभव सातकर याचे आरोपीच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून आरोपी अंकुश सातकर, सोपान खेंगले व अल्पवयीन मुल यांनी धारदार कोयत्याने रामचंद्र चंदू सातकर यांच्या मालकीच्या शेतातील बैलाच्या गोठ्यात वैभव सातकर याच्या डोक्यात, चेहऱ्यावर, पाठीवर व इतर ठिकाणी अनेक वार केले. यात गंभीर जखमी झाल्याने जागीच मृत्यू झाला. खुनातील आरोपी पोलिसांनी काही तासातच अटक केली..

घटनेची माहिती कळताच वडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमार कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड, पोलीस उपनिरीक्षक ऋतुजा मोहिते व पोलिसांनी धाव घेतली.

मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदन करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात रवाना केला.

पुढील तपास वडगाव मावळ पोलिस करत आहे.




लेटेस्ट अपडेट्स