मावळात 9 कोटी 12 लाखांचे रक्तचंदन जप्त; दोघांना अटक

876 views

तळेगाव दाभाडे दि.3 (प्रतिनिधी)कंटेनर मध्ये काथ्याच्या खाली 11,490 किलो रक्तचंदन घेऊनबे ग्लोर ते मुंबई दिशेने जात असताना, रविवारी (दि.2) सायंकाळी 4 वा. उर्से जुना टोलनाका फूडमॉल समोर ता.मावळ जि.पुणे हद्दीत मालमत्ता गुन्हे विरोधी पथक व शिरगाव परंदवडी पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. यात दोन आरोपी अटक असून 9 कोटी 11 लाख 91 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुन्हा दाखल सोमवारी (दि.3) पहाटे करण्यात आला.


Author : Admin
Publisher : admin
Update : 3 months ago
Date : Mon Mar 03 2025

image

रक्तचंदन तस्करी करणाऱ्या पुष्पा चा माल पोलिसांच्या हाती;



 राजाराम गंगाराम गायखे (वय 37, रा. काळेवाडी, ता. पारनेर, जिल्हा अहिल्यानगर ) व हरप्रीतसिंग धरमसिंग बदाना (वय 42, रा. विराज रेसिडेन्सी, सी विंग, फ्लॅट नंबर 303, बदलापूर, वेस्ट, ठाणे) यांना अटक केली आहे. इतर साथीदार फरार आहेत.


वरिष्ठ पोलीस निरीक्षक तेजस्विनी कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार गुप्त सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 

 बेग्लोर ते मुंबई दिशेने एम एच 43 वाय 0742 कंटेनर मधून रक्तचंदन तस्करी करत असल्याची माहिती मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार मालमत्ता गुन्हे विरोधी पथक व शिरगाव परंदवडी पोलिसांनी सापळा रचून उर्से टोलनाका फूडमॉल समोर कंटेनर चौकशी केली असता, आरोपी राजाराम गायखे व हरप्रीतसिंग बदाना यांची चौकशी केली व कंटेनरची झडती घेतली असता, काथ्या च्या खाली रक्तचंदन लपवून तस्करी करत असल्याने आरोपी कंटेनर व मुद्देमाल जप्त करण्यात आला.


 आरोपी व इतर साथीदार यांनी आपापसात संगणमत करून त्यांचा उद्देश साध्य करण्याकरिता स्वतःच्या फायद्या करिता कंटेनर क्रमांक MH 43 Y 0742 यामधून 8,61,75,000/- रुपयाचा प्रतिबंधित विनापरवाना बेकायदा 11,490 किलोग्रॅम वजनाचे रक्तचंदना च्या ओलसर लाकडाची अज्ञात ठिकाणाहून तोडून बेकायदेशीर वाहतूक करताना मिळून आले आहेत त्यांचेकडुन एकुण रक्कम रु. 9,11,91,000/- चा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी क्र. १ व २ यांचेवर BNS कलम 303(2), 3(5) भारतीय वन अधिनियम कलम 26, 41, 42 सह महाराष्ट्र खाजगी वृक्षतोड अधिनियम 1964 सुधारणा कलम 3, 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.





लेटेस्ट अपडेट्स

56 views
Image

कार्यकर्ते हेच आमचे खरे बलस्थान; पुढील प्रत्येक निर्णय त्यांच्या सल्ल्यानेच :– आमदार सुनील शेळके

वडगाव मावळ दि.24 (प्रतिनिधी) “मी आमदार आहे, कारण तुम्ही माझ्या मागे उभे राहिलात. आज निर्णय घ्यायचे असतील, तर तोही तुमच्या सल्ल्यानेच घ्यायचा,” असे स्पष्ट शब्दांत सांगत आमदार सुनील शेळके यांनी पक्ष संघटनेच्या बळकटीसाठी कार्यकर्त्यांना केंद्रस्थानी ठेवण्याची भूमिका मांडली. वडगाव मावळ येथे पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मावळ तालुकास्तरीय पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात पक्ष संघटनेच्या सुदृढ बांधणीसाठी नवे संकेत दिले गेले. आमदार सुनील शेळके यांच्या सडेतोड भाषणाने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. पक्षातील निर्णयप्रक्रियेत पारदर्शकता, २० सदस्यीय समितीचा निर्णायक हस्तक्षेप, तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयार राहण्याचे आवाहन यामुळे हा मेळावा यशस्वी ठरला.


Read More ..
149 views
Image

गोल्डन रोटरी चा पदग्रहण समारंभ दिमाखात साजरा.

तळेगाव दाभाडे दि.18 (प्रतिनिधी) रोटरी क्लब ऑफ निगडी च्या सौजन्याने रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडेचा चार्टर प्रदान व प्रथम पदग्रहण सोहळा सुशीला मंगल कार्यालय या ठिकाणी मोठ्या उत्साहात दिमाघदार सोहळ्यात संपन्न झाला. सर्व सदस्यांनी एकसारखे जॅकेट घातल्यामुळे कार्यक्रमाची शोभा वाढली होती. 3131 चे प्रांतपाल शितल शहा व रोटरी क्लब ऑफ निगडी चे अध्यक्ष सुहास ढमाले यांच्या हस्ते चार्टर प्रदान करण्यात आले. याप्रसंगी प्रांतपाल शितल शहा सहप्रांतपाल अशोक शिंदे प्रा डॉ मिलिंद भोई सहप्रांतपाल दीपक फल्ले निमंत्रक किरण ओसवाल हे व्यासपीठावर उपस्थित होते.


Read More ..