घरगुती वादातून पुतण्याने केला चुलत्याचा खून; मावळात चार दिवसात दुसरा खून

5266 views

वडगाव मावळ दि.4 (प्रतिनिधी) घरगुती वादातून पुतण्यासह एकाने चुलत्याच्या मानेवर कोयत्याने वार करून खून केल्याची घटना शुक्रवारी (दि.4) दुपारी 3:30 वा. धामणे ग्रामपंचायत कार्यालयाजवळ तालीम ता. मावळ जि. पुणे येथे घडली. शिरगाव परंदवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.


Author : Admin
Publisher : admin
Update : 6 months ago
Date : Fri Apr 04 2025

image


महादेव भगवान गराडे वय 73 रा. धामणे ता.मावळ असे खून झालेल्या चुलत्याचे नाव आहे.


मंगेश किसन गराडे वय 38 रा.धामणे मावळ व एक अनोळखी असे खुनातील आरोपी आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक तेजस्विनी कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार मयत महादेव गराडे व आरोपी मंगेश गराडे यांच्यात घरगुती वादा होते, त्यातून आरोपी मंगेश गराडे व त्याच्या एका साथीदाराने मयत महादेव गराडे यांच्या मानेवर कोयत्याने वार केले. यात गंभीर जखमी झाल्याने जागीच मृत्यू झाला. आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड, सहाय्यक पोलिस उपायुक्त बाळासाहेब कोपनर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तेजस्विनी कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक दुर्गानाथ साळी, पोलीस उप निरीक्षक प्रकाश पारखे, नाईद शेख व पोलीस कर्मचारी उपस्थित राहून पुढील तपास करत आहेत.

मावळ तालुक्यात चार दिवसात दुसरा खून झाला असून नात्यातील व्यक्तीचा खून होत असल्याने दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे.

पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक तेजस्विनी कदम करत आहेत.




लेटेस्ट अपडेट्स

446 views
Image

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नूतन वास्तूचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते; 761 कोटी 17 लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ!

तळेगाव दाभाडे दि.19 (प्रतिनिधी) मावळ तालुक्याच्या विकासाचा नवा अध्याय सोमवार, दि. 20 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता लिहिला जाणार आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते शिवशंभू तीर्थ मैदान, तळेगाव येथे संपन्न होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त एकूण 761 कोटी 17 लाख रुपयांच्या लोकार्पण व भूमिपूजनाच्या कामांचा शुभारंभ होणार असल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली.


Read More ..