भजन करून घरी निघालेल्या दुचाकीचा अपघात;पती पत्नीचा मृत्यू

9083 views

वडगाव मावळ दि.6 (प्रतिनिधी) भजन करून दुचाकीवरून घरी जात असताना अज्ञात कारने दुचाकीला जोरात धडक दिली त्यात पती व पत्नीचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (दि.5) रात्री 10:30 वा. कात्रज डेअरी समोर पुणे मुंबई महामार्गावर नायगाव ता. मावळ हद्दीत घडला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


Author : Admin
Publisher : admin
Update : 1 year ago
Date : Sun Oct 06 2024

imageअपघात

गणेश दत्तात्रय चोपडे व अर्चना गणेश चोपडे रा.नायगाव ता.मावळ जि.पुणे अपघातात मृत्यू झालेल्या पती व पत्नीचे नाव आहे.


कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश चोपडे व अर्चना चोपडे हे पती पत्नी भजन करून एम एच 14 GB 7074 या दुचाकीवरून घरी जात असताना काळ्या रंगाचा अज्ञात थार कारने दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातात गणेश चोपडे व अर्चना चोपडे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. यांच्या मागे दोन मुलं आहेत. राष्ट्रवादी विद्यार्थी तालुका अध्यक्ष नवनाथ चोपडे यांचा चुलत भाऊ व भावजयी होत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


मृतदेहाचे शवविच्छेदन तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्रात करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येत आहेत.

या अपघाताचा तपास पोलीस उप निरीक्षक अब्दुल शेख करत आहेत.



" महामार्गाच्या लगत सेवा रस्ता नसल्याने दिवसेंदिवस

 गावातील नागरिकांचे अपघातात बळी जात आहेत. अनेक ठिकाणी उड्डाणपूल करण्याची गरज असल्याची मागणी नागरिक करत आहेत.




लेटेस्ट अपडेट्स

1429 views
Image

मावळच्या 4 तहसीलदारांसह 10 अधिकाऱ्यांचे निलंबन ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा: मंगरूळ येथे 90 हजार ब्रास जास्त उत्खनन

नागपूर दि.13 (प्रतिनिधी) पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात वनीकरणासाठी राखीव असलेल्या क्षेत्रात तब्बल 90 हजार ब्रास अनधिकृत गौण खनिज उत्खनन झाल्याचे निष्पन्न झाल्याने महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी (दि.12) या घोटाळ्यात दोषी आढळलेले चार तहसीलदार, चार मंडळ अधिकारी आणि दोन तलाठी अशा दहा जणांना निलंबित करण्याचे निर्देश दिले. परवानगीपेक्षा जास्त उत्खनन केल्याने दोषीवर फौजदारी व महसुली अधिनियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.


Read More ..
545 views
Image

मावळात मल्टिनॅशनल कंपन्यांची कोट्यवधींची फसवणूक; दलालांची होणार चौकशी

नागपूर दि.9 (प्रतिनिधी) मावळ तालुक्यात गुंतवणुकीसाठी येणाऱ्या मल्टिनॅशनल कंपन्यांची काही दलालांकडून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले असून, याबाबत गंभीर आरोप आमदार सुनील शेळके यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात केले आहेत. हुंदाईसारखी कोरियन कंपनी महाराष्ट्रात आणणाऱ्या महायुती सरकारचा उद्देश रोजगारनिर्मिती असताना, काही दलालांनी कंपनीच्या व्हेंडरना बेकायदेशीर व फसवे दस्तऐवज दाखवून मिळकतीची विक्री करून आंतरराष्ट्रीय कंपनीलाच आर्थिक गंडा घातला, असे त्यांनी स्पष्ट केले.


Read More ..
1059 views
Image

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नूतन वास्तूचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते; 761 कोटी 17 लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ!

तळेगाव दाभाडे दि.19 (प्रतिनिधी) मावळ तालुक्याच्या विकासाचा नवा अध्याय सोमवार, दि. 20 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता लिहिला जाणार आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते शिवशंभू तीर्थ मैदान, तळेगाव येथे संपन्न होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त एकूण 761 कोटी 17 लाख रुपयांच्या लोकार्पण व भूमिपूजनाच्या कामांचा शुभारंभ होणार असल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली.


Read More ..