मावळात खांडशी तलाठ्याला लाच घेतल्या प्रकरणी अटक

3547 views

लोणावळा दि.26 (प्रतिनिधी) सातबारा उताऱ्यावर पीक नोंद करण्याच्या कामासाठी तक्रारदार शेतकऱ्याकडून 10,000 रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी खांडशी तलाठ्याला रंगेहात अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि.25) सायंकाळी 5:50 वा. कार्ला मंडलाधिकारी कार्यालयात कार्ला ता.मावळ येथे घडली. बुधवारी (दि.26) मध्यरात्री 1:35 वा लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला अटक करण्यात आली.


Author : Admin
Publisher : admin
Update : 1 year ago
Date : Wed Jun 26 2024

imageलाच

लोणावळा दि.26 (प्रतिनिधी) सातबारा उताऱ्यावर पीक नोंद करण्याच्या कामासाठी तक्रारदार शेतकऱ्याकडून 10,000 रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी खांडशी तलाठ्याला रंगेहात अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि.25) सायंकाळी 5:50 वा. कार्ला मंडलाधिकारी कार्यालयात कार्ला ता.मावळ येथे घडली.

बुधवारी (दि.26) मध्यरात्री 1:35 वा लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला अटक करण्यात आली.




अंकुश रामचंद्र साठे (वय 43, रा.तलाठी सजा खांडशी ता.मावळ मूळ वरुड भैरोबा मंदिराजवळ ता.खटाव जि.सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे. 



लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी तक्रारदार शेतकरी यांच्या गट नं. 9/1 सातबारा उताऱ्यावर गिनीगवत अशी नोंद झालेली आहे. ती गिनीगवत ची नोंद कमी करुन दुरुस्त नवीन सातबारा देण्यासाठी तलाठी अंकुश साठे यांनी तक्रारदार शेतकऱ्याकडे 10,000 रुपयेच्या लाचेची मागणी केली. त्यासंबंधी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथे तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे पथकाने सापळा रचून आरोपी तलाठी अंकुश साठे यांना कार्ला मंडलाधिकारी कार्यालयात लाच घेताना रंगेहात अटक केली.

लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. आरोपीला बुधवारी (दि.26) न्यायालयात हजर करणार आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांचा आदेशान्वये लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर

 करत आहेत.




लेटेस्ट अपडेट्स

1183 views
Image

मावळच्या 4 तहसीलदारांसह 10 अधिकाऱ्यांचे निलंबन ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा: मंगरूळ येथे 90 हजार ब्रास जास्त उत्खनन

नागपूर दि.13 (प्रतिनिधी) पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात वनीकरणासाठी राखीव असलेल्या क्षेत्रात तब्बल 90 हजार ब्रास अनधिकृत गौण खनिज उत्खनन झाल्याचे निष्पन्न झाल्याने महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी (दि.12) या घोटाळ्यात दोषी आढळलेले चार तहसीलदार, चार मंडळ अधिकारी आणि दोन तलाठी अशा दहा जणांना निलंबित करण्याचे निर्देश दिले. परवानगीपेक्षा जास्त उत्खनन केल्याने दोषीवर फौजदारी व महसुली अधिनियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.


Read More ..
352 views
Image

मावळात मल्टिनॅशनल कंपन्यांची कोट्यवधींची फसवणूक; दलालांची होणार चौकशी

नागपूर दि.9 (प्रतिनिधी) मावळ तालुक्यात गुंतवणुकीसाठी येणाऱ्या मल्टिनॅशनल कंपन्यांची काही दलालांकडून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले असून, याबाबत गंभीर आरोप आमदार सुनील शेळके यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात केले आहेत. हुंदाईसारखी कोरियन कंपनी महाराष्ट्रात आणणाऱ्या महायुती सरकारचा उद्देश रोजगारनिर्मिती असताना, काही दलालांनी कंपनीच्या व्हेंडरना बेकायदेशीर व फसवे दस्तऐवज दाखवून मिळकतीची विक्री करून आंतरराष्ट्रीय कंपनीलाच आर्थिक गंडा घातला, असे त्यांनी स्पष्ट केले.


Read More ..
901 views
Image

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नूतन वास्तूचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते; 761 कोटी 17 लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ!

तळेगाव दाभाडे दि.19 (प्रतिनिधी) मावळ तालुक्याच्या विकासाचा नवा अध्याय सोमवार, दि. 20 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता लिहिला जाणार आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते शिवशंभू तीर्थ मैदान, तळेगाव येथे संपन्न होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त एकूण 761 कोटी 17 लाख रुपयांच्या लोकार्पण व भूमिपूजनाच्या कामांचा शुभारंभ होणार असल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली.


Read More ..