3708 views
वडगाव मावळ दि.4 (प्रतिनिधी) मारामारीच्या दाखल गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी 50,000 रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस अधिकारी व पोलीस शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे 35,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि.4) सायंकाळी 7 वा. वडगाव मावळ पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीत ता. मावळ येथे केली.
सहाय्यक पोलीस उप निरीक्षक सुनील तुळशीदास मगर (वय 51) व पोलीस शिपाई सागर कैलास गाडेकर (वय 34) लाच घेतल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार यांच्या मारामारीच्या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस उप निरीक्षक सुनील मगर व पोलीस शिपाई सागर गाडेकर यांच्याकडे असल्याने तपासात मदत करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 50,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली तडजोड करून 35,000 रुपये लाचेची रक्कम ठरली, याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयात दि.29/8/24 रोजी तक्रार दिली.
त्यानुसार बुधवारी (दि.4) सायंकाळी 7 वा.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक शीतल जानवे, पोलीस उप अधीक्षक दयानंद गावडे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे किरण शेलार, कैलास महामुनकर, पूनम पवार , पांडुरंग माळी आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
आरोपींना पैसे घेताना रंगेहात अटक केली. त्यांच्यावर वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
पुणे-मुंबई महानगराच्या मध्यवर्ती असलेल्या मावळ तालुक्यात पोलीस, महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी बदली करून घेतात. मावळ तालुक्यात वारंवार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई होत असताना, अधिकारी व कर्मचारी बोध केव्हा घेणार ?