2226 views
वडगाव मावळ दि.21 (प्रतिनिधी) चौघांनी भेकर जातीच्या वन्यजीवाची शिकार करून मांस शिजवत असताना रंगेहात अटक केली. ही बुधवारी (दि.19) कारवाई मळवंडी ठुले ता.मावळ जि.पुणे हद्दीत केली. वडगाव मावळ न्यायालयाने आरोपींना शुक्रवार (दि.21) पर्यंत वन कोठडी दिली आहे.
वडगाव मावळ दि.21 (प्रतिनिधी) चौघांनी भेकर जातीच्या वन्यजीवाची शिकार करून मांस शिजवत असताना रंगेहात अटक केली. ही बुधवारी (दि.19) कारवाई मळवंडी ठुले ता.मावळ जि.पुणे हद्दीत केली. वडगाव मावळ न्यायालयाने आरोपींना शुक्रवार (दि.21) पर्यंत वन कोठडी दिली आहे.
दिनेश ज्ञानेश्वर ठुले (वय 35), गंगाराम धोंडीबा आखाडे (वय 36) व सुनील ठोकू कोकरे (वय ३६) तिघे रा. मळवंडी ठुले, ता. मावळ जि.पुणे) व सुमित तुकाराम गुरव (वय १७, रा. वाळीन , ता. मुळशी, जि. पुणे शिकार करून मांस शिजवल्याच्या गुन्ह्यातील वन कोठडीत असलेल्या आरोपींची नावे आहेत.
वडगाव मावळ वनपरिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार मोबाईलवर प्राप्त गुप्त माहितीच्या आधारे मुख्य वनसंरक्षक (प्रा.) पुणे एन. आर. प्रवीण, उपवनसंरक्षक (प्रा.) पुणे महादेव मोहिते, सहाय्यक वनसंरक्षक आशुतोष शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी वडगाव मावळ हनुमंत जाधव, वनपरिमंडळ अधिकारी दया डोमे, आशा मुंढे, वनरक्षक साईनाथ खटके, संदिप अरूण व बबन शिंदे, वनसेवक विशाल सुतार यांचे नियोजित पथकाने मळवंडी ठुले येथे धाड टाकली असता भेकर प्रजातींचा वन्य प्राण्याचे (शेड्युल 2 ) शिजवलेले मांस, मानवी बनावटीच्या 2 बंदुका, कोयता,भाला व काडतूस, छरा, गॅस सिलेंडर, शेगडी इत्यादी ताब्यात घेतले. सदरील घटनेतील आरोपी दिनेश ज्ञानेश्वर ठुले, गंगाराम धोंडीबा आखाडे, सुनील ठोकू कोकरे व सुमित तुकाराम गुरव यांचे विरुध्द भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये वन गुन्हा नोंद करुन आरोपीना ताब्यात घेतले असुन पुढील तपास चालु आहे.
आरोपींना वडगाव मावळ न्यायालयात हजर केले असता, गुन्ह्याचा अधिक तपास करण्यासाठी शुक्रवार (21) पर्यंत वन कोठडी सुनावली आहे.
वन तोड व वन्यजीव शिकार बाबत नागरिकांनी कार्यालयात संपर्क करावा.