यात्रेत झालेल्या वादातून चौघांनी एकावर केला प्राणघातक हल्ला

4817 views

वडगाव मावळ दि.15 (प्रतिनिधी) गावच्या यात्रेत झालेल्या वादातून चौघांनी एकाला पिस्तूल दाखवून तलवार व लाकडी दांडक्याने डोक्यात व शरीरावर मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी (दि.14) सायंकाळी 5:15 वा. निगडे ता. मावळ जि. पुणे हद्दीत घडला. जखमी फिर्यादी संतोष मारुती करवंदे वय 40 रा. कल्हाट ता.मावळ जि.पुणे यांनी वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.


Author : Admin
Publisher : admin
Update : 1 year ago
Date : Sat Feb 15 2025

image

 संतोष महादु जाचक (वय 35, रा. स्वराज्य नगरी फ्लॅट नं 4, स्वामी दर्शन अपार्टमेंट तळेगाव दाभाडे ता. मावळ जि. पुणे मूळ रा . करवंदे वस्ती कल्हाट ता. मावळ जि. पुणे), आदिनाथ लाला खापे (वय 27 रा. कोंडीवडे ता. मावळ जि.पुणे), रोहन मुरलीधर आरडे (वय 23) व ओमकार देविदास खांडभोर (वय 23) दोघे रा घाटेवाडी पोस्ट वडेश्वर ता. मावळ जि.पुणे गुन्ह्यातील आरोपींची नावे आहेत.


पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार  निगडे ता मावळ जि पुणे हद्दीत डांबरी रोडवर फिर्यादी हे तानाजी भगवान करवंदे, विनोद दादाभाऊ कोयते व नवनाथ बापु देशमुख असे कार एम. एच. 14 एल. वाय 2842 मधुन कल्हाट कडे जात असताना, आरोपी संतोष जाचक, अधिनाथ खापे, रोहन आरडे व ओमकार खांडभोर आदींनी गावच्या यात्रेत झालेल्या वादाचे कारणावरून संगनमत करून त्यांचेकडे असलेले स्विफ्ट कार ही फिर्यादीच्या कारला आडवी मारून फिर्यादीची गाडी थांबवुन गाडीच्या काचा फोडुन संतोष महादु जाचक याने फिर्यादीला त्याचेकडील पिस्टल दाखवून गाडी मधुन खाली उतरण्यास भाग पाडले आरोपी संतोष जाचक व तिघांनी तलवार व लाकडी दांडक्याने फिर्यादीला डोक्यावर व शरिरावर ठिकठिकाणी वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. घटनास्थळावरून आरोपींनी पळ काढला. जखमी संतोष करवंदे यांना सोमाटणे फाटा येथील पवना हॉस्पिटल मध्ये उपचारसाठी दाखल करण्यात आले. 



वडगाव मावळ पोलिस स्टेशन गु.र.नं 64/2025 भारतीय न्याय संहिता अधि सन 2023 चे, कलम109,189(2),189(4), 191(3),191(2),190,324(4),126(2), 352, 351(2) आर्म अँक्ट 3(25), 4(27) महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 गुन्हा दाखल केला आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड करत आहेत.




लेटेस्ट अपडेट्स

1363 views
Image

मावळच्या 4 तहसीलदारांसह 10 अधिकाऱ्यांचे निलंबन ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा: मंगरूळ येथे 90 हजार ब्रास जास्त उत्खनन

नागपूर दि.13 (प्रतिनिधी) पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात वनीकरणासाठी राखीव असलेल्या क्षेत्रात तब्बल 90 हजार ब्रास अनधिकृत गौण खनिज उत्खनन झाल्याचे निष्पन्न झाल्याने महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी (दि.12) या घोटाळ्यात दोषी आढळलेले चार तहसीलदार, चार मंडळ अधिकारी आणि दोन तलाठी अशा दहा जणांना निलंबित करण्याचे निर्देश दिले. परवानगीपेक्षा जास्त उत्खनन केल्याने दोषीवर फौजदारी व महसुली अधिनियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.


Read More ..
482 views
Image

मावळात मल्टिनॅशनल कंपन्यांची कोट्यवधींची फसवणूक; दलालांची होणार चौकशी

नागपूर दि.9 (प्रतिनिधी) मावळ तालुक्यात गुंतवणुकीसाठी येणाऱ्या मल्टिनॅशनल कंपन्यांची काही दलालांकडून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले असून, याबाबत गंभीर आरोप आमदार सुनील शेळके यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात केले आहेत. हुंदाईसारखी कोरियन कंपनी महाराष्ट्रात आणणाऱ्या महायुती सरकारचा उद्देश रोजगारनिर्मिती असताना, काही दलालांनी कंपनीच्या व्हेंडरना बेकायदेशीर व फसवे दस्तऐवज दाखवून मिळकतीची विक्री करून आंतरराष्ट्रीय कंपनीलाच आर्थिक गंडा घातला, असे त्यांनी स्पष्ट केले.


Read More ..
1015 views
Image

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नूतन वास्तूचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते; 761 कोटी 17 लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ!

तळेगाव दाभाडे दि.19 (प्रतिनिधी) मावळ तालुक्याच्या विकासाचा नवा अध्याय सोमवार, दि. 20 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता लिहिला जाणार आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते शिवशंभू तीर्थ मैदान, तळेगाव येथे संपन्न होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त एकूण 761 कोटी 17 लाख रुपयांच्या लोकार्पण व भूमिपूजनाच्या कामांचा शुभारंभ होणार असल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली.


Read More ..