धारदार कोयत्याने डोक्यात हातावर वार करून एकाचा खून; तळेगाव दाभाडे येथील घटना

5651 views

तळेगाव दाभाडे दि.31 (प्रतिनिधी) वयक्तिक जुन्या वादातून चौघांनी एकावर धारदार कोयत्यानी डोक्यात दोन व हातावर तीन वार करून खून केल्याची घटना तळेगाव शहरात शुक्रवारी (दि. ३१) सायंकाळी 4:30 वा. सरस्वती विद्या मंदिराच्या गेटजवळ घडली. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये मयताच्या आईने फिर्याद दिली आहे. खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.


Author : Admin
Publisher : admin
Update : 9 months ago
Date : Fri Jan 31 2025

imageखून



आर्यन शंकर बेडेकर (वय 19, रा. सिद्धार्थ नगर तळेगाव दाभाडे ता. मावळ) खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

संतोष कोळी, शिवराज कोळी दोघे रा वराळे ता. मावळ व इतर दोघेजण खुनातील आरोपी आहेत. 


 वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायनावर यांनी दिलेल्या माहितीनुसार मयत आर्यन बेडेकर व आरोपी हे मित्र होते. त्यांच्या जुन्या वादातून आरोप संतोष कोळी, शिवराज कोळी व इतर दोघांनी धारदार कोयत्याने डोक्यात व डाव्या हातावर वार केले. यात गंभीर जखमी होवून रक्तस्त्राव झाल्याने मृत्यू झाला. घटनास्थळावरून आरोपी फरार झाले.


घटनेची माहिती मिळताच तळेगाव दाभाडे पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली, मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला आहे.

 पोलीस पथके रवाना केली असून सीसीटिव्ही कॅमेरे तपासणी केली असून आरोपींना लवकरच अटक करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. प्राथमिक तपास पोलीस उप निरीक्षक ए के मुल्ला करत आहेत




लेटेस्ट अपडेट्स

446 views
Image

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नूतन वास्तूचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते; 761 कोटी 17 लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ!

तळेगाव दाभाडे दि.19 (प्रतिनिधी) मावळ तालुक्याच्या विकासाचा नवा अध्याय सोमवार, दि. 20 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता लिहिला जाणार आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते शिवशंभू तीर्थ मैदान, तळेगाव येथे संपन्न होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त एकूण 761 कोटी 17 लाख रुपयांच्या लोकार्पण व भूमिपूजनाच्या कामांचा शुभारंभ होणार असल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली.


Read More ..