2505 views
वडगाव मावळ दि.30 (प्रतिनिधी) शाळेला जाणाऱ्या अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याची घटना मावळ पुणे येथे गुरुवारी (दि.29) रोजी घडली. आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक केली. शुक्रवारी (दि.30) वडगाव मावळ न्यायालयाने आरोपाची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. पीडित अल्पवयीन मुलीच्या पालकांनी वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली.
पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार शाळेला जात असणाऱ्या मुलींचा आरोपी सुरज सोपान कदम (वय 30) याने मुलींना डोळा मारून बायबाय करत पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी (दि.29) च्या अगोदर चार पाच दिवसांपूर्वी ही घटना घडली. घाबरलेल्या अल्पवयीन मुलींनी ही घटना आईवडिलांना सांगितल्याने वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपीला तात्काळ अटक करून मावळ न्यायालयात हजर केले असता, आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. या घटनेने मुली व महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वडगाव मावळ पोलिसांच्या वतीने शाळा व महाविद्यालयात मुली व महिला सुरक्षा बाबत जनजागृती तसेच गुड टच आणि बॅड टच बाबत माहिती प्रात्यक्षिक दिले आहे. महाराष्ट्रात मुली व महिला अत्याचाराच्या घटनेत वाढ होत असून पोलिसांकडून शाळा व महाविद्यालय परिसरात पोलीस गस्त घालण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.
या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड करत आहेत.