खंडणीसाठी अपहरण करून बैलगाडा मालकाचा खून नवलाख उंब्रे मावळ येथील घटना

8707 views

वडगाव मावळ दि.21 (प्रतिनिधी) मावळ नवलाख उंब्रे प्रसिद्ध बैलगाडा मालक मॉगी बैलाचे मालक पंडित रामचंद्र जाधव वय 52 रा.जाधववाडी नवलाख उंब्रे ता.मावळ जि.पुणे. यांचा खंडणीसाठी अपहरण करून खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळला. सुरज वानखेडे या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


Author : Admin
Publisher : admin
Update : 9 months ago
Date : Fri Nov 22 2024

image

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पंडित जाधव यांना आरोपी सुरज वानखेडे सह इतर साथीदारांनी

दि.14/11/24 रोजी 50 लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केले होते. त्यानंतर म्हाळुंगे पोलीस स्टेशनच्या शिवे वागाव हद्दीत खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळून टाकला.आरोपींनी मयत पंडित जाधव यांच्या मोबाईल वरून त्यांच्या पत्नीच्या मोबाईलवर वारंवार मी बैल खरेदीसाठी बाहेर आहे. मला 80 लाखांची गरज आहे. निवडणूक आहे मतदान झाल्यावर येतो असे वारंवार मेसेज पाठविले होते. त्यामुळे मयत पंडित जाधव यांच्या कुटुंबियांना काहीच निर्णय घेता येईना, अखेर गुरुवारी (दि.21) सकाळी या खुनाच्या गुन्ह्याची उकल खंडणी विरोधी पथकाकडून उघडकीस करण्यात आली. आरोपी हा मयत यांच्या गाडीवर चालक होता. यातील आरोपी मागील 15 वर्षांपासून मयत यांच्या ओळखीचे होते. आरोपींनी गुन्हा का केला याबाबत पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव करत आहेत.



सविस्तर बातमी काही वेळात




लेटेस्ट अपडेट्स

60 views
Image

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अतिक्रमणे काढल्यानंतर त्या भागात तातडीने रस्ते करा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आढावा बैठकीत संबधीत यंत्रणांना निर्देश

चाकण दि.8 प्रतिनिधी वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी हिंजवडीसह चाकण परिसरात काढण्यात येणाऱ्या अतिक्रमणानंतर त्या भागात तातडीने रस्ते विकसित करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने संबंधित यंत्रणांनी समन्वयातून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अपेक्षित प्रमाणात रस्त्यांचे रुंदीकरण करून रस्ते विकसित करण्याच्या दृष्टीने तातडीने पावले उचलण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आकुर्डी येथील मुख्यालयात त्यांनी चाकण भागातील वाहतूक कोंडी दूर करण्याच्या अनुषंगााने पाहणी केल्यानंतर आढावा बैठक घेतली, यावेळी ते बोलत होते.


Read More ..