भरधाव कंटेनरने वाहतूक पोलिसाला चिरडले पोलिसाचा जागीच मृत्यू

2845 views

वडगाव मावळ दि.13 (प्रतिनिधी) वाहतूक नियमन करणाऱ्या वाहतूक पोलिसाला भरभाव कंटेनरने चिरडले यात वाहतूक पोलिसाचा जागीच मृत्यू ही घटना मंगळवारी (दि.13) रात्री 9:40 वा. वडगाव तळेगाव दाभाडे फाटा पुणे मुंबई महामार्गावर घडली.


Author : Admin
Publisher : admin
Update : 3 months ago
Date : Wed May 14 2025

image

मिथुन वसंत धेंडे वय 49 रा. उरुळी कांचन पुणे सध्या वडगाव पोलीस स्टेशन ता.मावळ जि.पुणे अपघातात मृत्यू झालेल्या वाहतूक पोलिसाचे नाव आहे.


पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई बाजू कडून चाकणकडे जाणाऱ्या भरधाव कंटेनर चालकाने वाहतूक नियमन करणाऱ्या वाहतूक पोलिसाला चिरडले. यात धेंडे यांचा जागीच मृत्यू झाला. कंटेनर चालक चाकण बाजूला वेगाने निघून गेला. कंटेनर चालक हा कार्ला फाटा येथून धोकादायक भरधाव वाहन चालवत असतानाचा, एका तरुणाने व्हिडिओ काढला. पोलिसांना माहिती दिली. पुणे ग्रामीण कंट्रोल वरून कंटेनर थांबविण्याचे आदेश झाल्याने कंटेनर थांबवत असताना, भरभाव वेगाने वाहतूक पोलिसांना चिरडले.

या अपघाताचा तपास वडगाव मावळ पोलीस करत आहे.

14 मे रोजी धेंडे यांचा वाढदिवस होता. या अपघाती निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

घटनास्थळी पुणे ग्रामीण पोलीसअधीक्षक पंकज देशमुख, अप्परपोलीसअधीक्षकरमेश चोपडे यांनी भेट दिली. याघटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. आमच्या पोलिसाचा खून झाला असल्याचे म्हणाले.





लेटेस्ट अपडेट्स

31 views
Image

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अतिक्रमणे काढल्यानंतर त्या भागात तातडीने रस्ते करा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आढावा बैठकीत संबधीत यंत्रणांना निर्देश

चाकण दि.8 प्रतिनिधी वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी हिंजवडीसह चाकण परिसरात काढण्यात येणाऱ्या अतिक्रमणानंतर त्या भागात तातडीने रस्ते विकसित करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने संबंधित यंत्रणांनी समन्वयातून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अपेक्षित प्रमाणात रस्त्यांचे रुंदीकरण करून रस्ते विकसित करण्याच्या दृष्टीने तातडीने पावले उचलण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आकुर्डी येथील मुख्यालयात त्यांनी चाकण भागातील वाहतूक कोंडी दूर करण्याच्या अनुषंगााने पाहणी केल्यानंतर आढावा बैठक घेतली, यावेळी ते बोलत होते.


Read More ..
162 views
Image

नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करुन महसूल सप्ताह यशस्वी करा- जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

पुणे दि.31 (प्रतिनिधी) महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा, राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती व प्रत्यक्ष लाभ अधिकाधिक नागरिकांना मिळावा यासाठी येत्या 1 ते 7ऑगस्ट २०२५ दरम्यान राबविण्यात येणाऱ्या महसूल सप्ताहामध्ये नागरिकांना सहभागी करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले. शासनाच्या कामकाजाप्रती नागरिकांचा विश्वास वृद्धींगत होईल यावर लक्ष केंद्रित करत नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करुन सप्ताह यशस्वी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.


Read More ..