2189 views
वडगाव मावळ दि.20 (प्रतिनिधी) अज्ञात चोरट्यांनी बंद फ्लॅटच्या घराच्या दरवाजाचे कुलूप कोयंडा तोडून सोन्या चांदीचे दागिन्यासह दुचाकी असा 3 लाख 28 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना शुक्रवारी (दि.19) रात्री 11 वा ते शनिवारी (दि.20) सकाळी 7 च्या सुमारास ग्रीन मिडोज सोसायटी कामशेत ता. मावळ हद्दीत घडली. स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्ह्याचे नेते कोंडीबा गबाजी रोकडे वय 62 यांनी कामशेत पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली.
कामशेत पोलिस स्टेशन गु .र.नं 154/2024 भा. न्याय संहिता कलम 331(3),331(4),305(A),303(2) गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार कामशेत हद्दीत ग्रिन मिडोज सोसायटीत फिर्यादी कोंडीबा रोकडे यांच्या फ्लॅट नं बी 9 या बंद घराचे अज्ञात चोरट्यांनी कुलुप कोयंडा कशानेतरी तोडुन आत प्रवेश करुन घरातील
30 ग्रॅम सोन्याचे गंठन 1,80,000 रुपये, 5.5 ग्रॅम सोन्याच्या दोन अंगुठी 30,000 रुपये, 100 ग्रॅम चांदीचे 3 शिक्के 18,000 रुपये, चांदिच्या पट्या व जोडवे एक जोड 8,000 रुपये, कानातील सोन्याची कर्णफुले 6 ग्रॅम 36,000 रुपये, मनगटी दोन घड्याळ एक लेडीज व एक जेन्टस टायटन कंपनिचे 8,000 रुपये, रोख 23.000 रुपये रक्कम, काळे रंगाची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल नं MH 12 RB 4790 तीचा चैसी नं MBL HAR075J5J18339 व इंजिन नं HA10AGJ5J27949 किमंत 25,000 रुपये असा एकूण 3,28,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
कामशेत मध्ये चोऱ्याच्या घटनात वाढ होत असून रात्रगस्त वाढवण्याची मागणी नागरिक करत आहेत.
लोणावळा उप विभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांनी घटनास्थळी भेट दिली.
सीसीटीव्ही कॅमेरे फुटेज तपासणी करून लवकरच चोरटे जेरबंद करणार असल्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.
पुढील तपास कामशेत पोलीस करत आहेत.