मावळात मतिमंद युवतीवर लैंगिक अत्याचार; आरोपी पोलीस कोठडीत

1525 views

वडगाव मावळ दि.24 (प्रतिनिधी) मतिमंद युवतीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची घटना आढे ता.मावळ हद्दीत घडली. पीडित युवतीच्या आईने शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशनमध्ये शनिवारी (दि.21) गुन्हा दाखल केला. आरोपीला वडगाव मावळ न्यायालयाने गुरुवार (दि.26) पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.


Author : Admin
Publisher : admin
Update : 4 months ago
Date : Tue Jun 24 2025

image


वडगाव मावळ दि.24 (प्रतिनिधी) मतिमंद युवतीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची घटना आढे ता.मावळ हद्दीत घडली. पीडित युवतीच्या आईने शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशनमध्ये शनिवारी (दि.21) गुन्हा दाखल केला. आरोपीला वडगाव मावळ न्यायालयाने गुरुवार (दि.26) पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

संतोष पंढरीनाथ सुतार (वय 45 रा.आढे ता.मावळ जि.पुणे) लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीचे नाव आहे.


सहाय्यक पोलिस उपायुक्त बाळासाहेब कोपनर यांनी दिलेल्या माहितीनुसार मतिमंद युवतीवर आरोपी संतोष सुतार याने वारंवार लैंगिक अत्याचार केले असून पीडित युवतीच्या आईने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी अटक आरोपीला रविवारी (दि.22) वडगाव मावळ न्यायालयात हजर केले असता, गुरुवार (दि.26) पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

पुढील तपास सहाय्यक पोलिस उपायुक्त बाळासाहेब कोपनर करत आहेत.

मावळात महिला अत्याचारांच्या घटनेत वाढ होत आहेत.




लेटेस्ट अपडेट्स

424 views
Image

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नूतन वास्तूचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते; 761 कोटी 17 लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ!

तळेगाव दाभाडे दि.19 (प्रतिनिधी) मावळ तालुक्याच्या विकासाचा नवा अध्याय सोमवार, दि. 20 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता लिहिला जाणार आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते शिवशंभू तीर्थ मैदान, तळेगाव येथे संपन्न होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त एकूण 761 कोटी 17 लाख रुपयांच्या लोकार्पण व भूमिपूजनाच्या कामांचा शुभारंभ होणार असल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली.


Read More ..