यात्रेत जेवणावरून झालेल्या वादातून तिघांनी लोखंडी रॉड व दगडाने एकाला केली गंभीर मारहाण

1463 views

वडगाव मावळ दि.15 (प्रतिनिधी) यात्रेत जेवणावरून झालेल्या वादातून सख्ख्या भावासह दोघांनी एकाला लोखंडी रॉड व दगडाने डोक्यात पायावर पाठीवर मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना रविवारी (दि.13) सकाळी 11 वा. ढाकभैरी जांभवली ता.मावळ जि.पुणे हद्दीत


Author : Admin
Publisher : admin
Update : 1 year ago
Date : Tue Apr 15 2025

image


आरोपींना अद्यापही अटक नाही आरोपी मोकाट आहेत.


लक्ष्मण तुकाराम टोकरे वय 55 रा.पाले नामा ता.मावळ असे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 


बंडु तुकाराम टोकरे, किसन विठठल सोरकादे व शरद किसन सोरकादे सर्व रा. पाले नामा ता.मावळ गंभीर मारहाण गुन्ह्यातील आरोपींची नावे आहेत.


पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी जखमी लक्षण टोकरे हे रविवारी (दि.13) सकाळी 11 वा. पाले गावातील लोकांसह पिक-अप करुन ढाकभैरी जांभवली येथे यात्रे निमित्त जेवण्याचा कार्यक्रम करण्यासाठी ढाकभैरीच्या पायथ्याला आले, मी व गावातील लोकांनी जेवन तयार करुन देवाला नैवदय दाखवुन जेवण्यसाठी बसलो, त्यावेळी फिर्यादीने लोकांना जेवण वाढा उशीर झाला आहे असे म्हणाले असता,



माझा मोठा भाऊ आरोपी बंडू टोकरे मला म्हणाला तु काय आमदार आहेस का त्यावेळी मी पण त्यास तु काय आमदार आहेस का असे म्हणालेचा राग मनात धरुन मोठा भाऊ आरोपी बंडु तुकाराम टोकरे, किसन विठठल सोरकादे व शरद किसन सोरकादे यांनी माझ्या अंगावर धावून येवून मला हाताने व लाथा बुक्याने मारहाण करु लागले त्यावेळी मी त्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता आरोपी बंडु टोकरे हा हाताने मारहान करत होता व किसन सोरकादे याने शेजारी पडलेला दगड माझे उजव्या पायाच्या खुब्यावर मारला व शरद सोरकादे याने तेथे शेजारी पडलेला लोखंडी रॉडने माझ्या डोक्यात, पायावर व पाठीवर मारहाण केली. गावातील लोक धावून आल्याने आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. गंभीर जखमी लक्ष्मण टोकरे हे बेशुद्धावस्थेत पडले होते त्यांच्यावर कामशेत येथील महावीर हॉस्पीटल मध्ये उपचार सुरू आहेत.


पुढील तपास पोलीस उप निरीक्षक दत्ता शेडगे करत आहेत.





लेटेस्ट अपडेट्स

1395 views
Image

मावळच्या 4 तहसीलदारांसह 10 अधिकाऱ्यांचे निलंबन ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा: मंगरूळ येथे 90 हजार ब्रास जास्त उत्खनन

नागपूर दि.13 (प्रतिनिधी) पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात वनीकरणासाठी राखीव असलेल्या क्षेत्रात तब्बल 90 हजार ब्रास अनधिकृत गौण खनिज उत्खनन झाल्याचे निष्पन्न झाल्याने महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी (दि.12) या घोटाळ्यात दोषी आढळलेले चार तहसीलदार, चार मंडळ अधिकारी आणि दोन तलाठी अशा दहा जणांना निलंबित करण्याचे निर्देश दिले. परवानगीपेक्षा जास्त उत्खनन केल्याने दोषीवर फौजदारी व महसुली अधिनियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.


Read More ..
499 views
Image

मावळात मल्टिनॅशनल कंपन्यांची कोट्यवधींची फसवणूक; दलालांची होणार चौकशी

नागपूर दि.9 (प्रतिनिधी) मावळ तालुक्यात गुंतवणुकीसाठी येणाऱ्या मल्टिनॅशनल कंपन्यांची काही दलालांकडून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले असून, याबाबत गंभीर आरोप आमदार सुनील शेळके यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात केले आहेत. हुंदाईसारखी कोरियन कंपनी महाराष्ट्रात आणणाऱ्या महायुती सरकारचा उद्देश रोजगारनिर्मिती असताना, काही दलालांनी कंपनीच्या व्हेंडरना बेकायदेशीर व फसवे दस्तऐवज दाखवून मिळकतीची विक्री करून आंतरराष्ट्रीय कंपनीलाच आर्थिक गंडा घातला, असे त्यांनी स्पष्ट केले.


Read More ..
1036 views
Image

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नूतन वास्तूचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते; 761 कोटी 17 लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ!

तळेगाव दाभाडे दि.19 (प्रतिनिधी) मावळ तालुक्याच्या विकासाचा नवा अध्याय सोमवार, दि. 20 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता लिहिला जाणार आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते शिवशंभू तीर्थ मैदान, तळेगाव येथे संपन्न होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त एकूण 761 कोटी 17 लाख रुपयांच्या लोकार्पण व भूमिपूजनाच्या कामांचा शुभारंभ होणार असल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली.


Read More ..