1074 views
वडगाव मावळ दि.20 (प्रतिनिधी) तुझी नात माझ्या मुलाला का देत नाहीस या कारणावरून सख्या भावाने भावाचा छातीवर चाकू सारख्या धारदार शस्त्राने वार करून खून केला, ही घटना शुक्रवारी (दि.20) दुपारी 1:30 वा. वडगाव मावळ रेल्वे स्टेशनच्या मोकळ्या जागेत ता.मावळ जि.पुणे हद्दीत घडली. मयत व आरोपी परप्रांतीय असून काही दिवसांपासून रेल्वे स्टेशनच्या मोकळ्या जागेत पालाचे घर करून राहत होते.
उदेश पारधी उर्फ उदेश नाबाब राजपूत वय 45 रा. मूळ मुरवाडा स्टेशन जिल्हा कटनी मध्य प्रदेश असे खून झालेल्या भावाचे नाव आहे.
नटू शबस्ता नाबब राजपूत (वय 40) सख्या भावाचा खुनातील आरोपी आहे.
लोणावळा उप विभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मायने यांनी दिलेल्या माहितीनुसार मयत उदेश पारधी राजपूत व आरोपी नटू राजपूत हे सख्ये भाऊ असून ते काही दिवसांपासून वडगाव मावळ रेल्वे स्टेशनच्या मोकळ्या जागेत राहत होते. शुक्रवारी मयत भावाच्या मुलीची मुलगी आरोपी त्याच्या मुलासाठी मागत होता. यातून वाद वाढत गेल्याने चाकू सारख्या धारदार शस्त्राने आरोपी भावाने सख्या भावाच्या छातीवर वार केला. घटनास्थळावरून फरार झाला.
वडगाव मावळ रेल्वे स्टेशन परिसरात खून झाल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली. जखमीला वैद्यकीय उपचारासाठी दाखल केले असता, उपचारापूर्वीच मयत झाल्याचे घोषित केले.
घटनास्थळी त्वरित लोणावळा उप विभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मायने, पोलीस निरीक्षक कुमार कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड व पोलिसांनी धाव घेतली.
या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार डोईजड करत आहेत. आरोपीला अटक करण्यासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले आहे.
मावळ तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडगाव नगरपंचायत हद्दीत अनेक ठिकाणी परप्रांतीय टोळ्या पालाचे घर करून वास्तव्य करत आहेत. पोलिसांनी अश्या कुटुंबाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.