संतापजनक ! रक्षकच झाले भक्षक; मावळ विसापूर किल्ला परिसरात पाच वर्षांच्या चिमुकलीवर पोलिसांकडून अत्याचार

1902 views

वडगाव मावळ दि.26 (प्रतिनिधी) विसापूर किल्ला परिसरात आई- वडिलांसोबत फिरण्यासाठी आलेल्या पाच वर्षाच्या चिमुकलीवर बंदोबस्तावर असलेल्या पोलिसाने लैंगिक अत्याचार केला. मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून आडोशाला नेऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी संबंधित पोलिसाला अटक केली आहे. ही धक्कादायक घटना बुधवारी (दि. 25) घडली.


Author : Admin
Publisher : admin
Update : 6 months ago
Date : Thu Dec 26 2024

imageअत्याचार





सचिन वसंत सस्ते वय 43, मूळ रा. साकुर्डे ता. पुरंदर जि पुणे सद्या हडपसर पुणे अटक केलेल्या आरोपी पोलिसाचे नाव आहे.


 याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाताळनिमित्त मावळ तालुक्यातील पर्यटन स्थळांवर पोलिसांकडून अधिकचा बंदोबस्त लावण्यात आला होता. पर्यटन स्थळावर सुट्टीच्या अनुषंगाने लोक फिरण्यासाठी येतात. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता. लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या विसापूर किल्ल्यावर पुणे ग्रामीण मुख्यालय येथून अधिकचा बंदोबस्त मागविण्यात आला होता. त्यामध्ये पोलीस सचिन सस्ते हा देखील विसापूर किल्ला परिसरात बंदोबस्तावर होता.



विसापूर किल्ला पाहण्यासाठी पाच वर्षीय चिमुकली तिच्या आई-वडिलांसोबत आली होती. त्या चिमुकलीला सचिन सस्ते याने चॉकलेटचा आमिष दाखवले आणि आडोशाला नेले. तिथे तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार मुलीने आपल्या पालकांना सांगितला. पालकांनी तात्काळ पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी पोलीस सचिन सस्ते याला अटक केली आहे.

पोलिसांकडून कृत्ये झाल्याने रक्षकच झाले भक्षक यामुळे सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. मावळात चाललंय तरी काय ?




लेटेस्ट अपडेट्स

157 views
Image

*PMRDA क्षेत्रातील नियमबाह्य गृहप्रकल्पांवर कारवाईसाठी १५ दिवसांची अंतिम मुदत*

मुंबई दि.11 (प्रतिनिधी) PMRDA क्षेत्रातील नियमबाह्य गृहप्रकल्पांवर कारवाईसाठी अखेर १५ दिवसांची अंतिम मुदत जाहीर करण्यात आली असून, विधानसभेचे उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या फेरआढावा बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देण्यात आले. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा केला होता. नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने शेळके यांच्या प्रयत्नांना अखेर यश लाभले आहे.


Read More ..