undefined तुषार कामठे

1104 views

पिंपरी दि.23 (प्रतिनिधी) नुकतेच बालेवाडी येथे पार पडलेल्या भाजपच्या अधिवेशनादरम्यान गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्राचे भाग्यविधाते, लोकनेते शरदचंद्र पवार बद्दल अतिशय खोटारडी व खालच्या पातळीवर टीका केली. देशाच्या गृहमंत्री पदावरील व्यक्तीने बाहेरून येऊन इथे आपल्या महाराष्ट्रात पवार वर टीका करणे अतिशय निंदाजनक व संतापजनक असून महाराष्ट्रातील तमाम मराठी जनतेच्या भावनांचा त्यांनी अपमान केला आहे. हा स्वाभिमानी महाराष्ट्र हे कधीही खपवून घेणार नाही, असे सांगत भाजपच्या अमित शहांचा जाहीर निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज पिंपरी येथे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी, उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी भाजपविरोधात तसेच गृहमंत्री अमित शहा विरोधात घोषणा देत निषेध व्यक्त केला.


Author : Admin
Publisher : admin
Update : 1 year ago
Date : Tue Jul 23 2024

imageनिषेध



राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पिंपरीत निषेध आंदोलन..





यावेळी बोलताना शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी सांगितले की, शरद पवार साहेब हे महाराष्ट्राच्या तमाम स्वाभिमानी मराठी जनतेची अस्मिता आहे, बाहेरून आपल्या महाराष्ट्रात येऊन पवार साहेबांबद्दल कुणीही अकलेचे तारे तोडले, खोटारडी टीका केली तर स्वाभिमानी मराठी जनता हे कदापी खपवून घेणार नाही, अमित शहांनी किमान एवढं भान ठेवायला हवं होतं की ज्या वास्तूत उभं राहून आपण आदरणीय पवार साहेबांवर खोटारडे आरोप करतोय, ती वास्तू म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल बालेवाडी ते आंतरराष्ट्रीय संकुल आदरणीय पवार साहेबांच्या प्रयत्नांतूनच साकार झाले आहे. शिवाय गुजरातेतून इथं येऊन आपल्या महाराष्ट्राच्या लोकनेत्यांबद्दल अमित शहा बोलत असताना समोर बसलेले भाजपचे मराठी पदाधिकारी मूग गिळून ऐकत होते हे दुर्दैव, ही लाचारी स्थानिक भाजपाईंना देशोधडीला लावल्याशिवाय राहणार नाही. यापुढे अमित शहा कधीही पुणे जिल्ह्यात आल्यास त्यांना काळे झेंडे दाखवून आम्ही त्यांचा जाहीर निषेध करू असा इशारा शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी यावेळी दिला.



यावेळी प्रदेश युवक सचिव प्रशांत सपकाळ, मा. नगरसेवक विनायक रणसुभे, कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष सागर चिंचवडे, योगेश सोनवणे कैलास बनसोडे, विशाल जाधव, अल्ताफ शेख, सचिन गायकवाड, विनोद धुमाळ, राहुल आहेर, काशिनाथ जगताप, हेमंत बलकवडे, ज्ञानेश्वर आल्हाट, संजय पडवळ, अनिल भोसले, राजू खंडागळे, सुनील कस्पटे, विशाल काळभोर, शादाब खान, सुनील लांडे, इखलास सय्यद संदीप देसाई आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




लेटेस्ट अपडेट्स

60 views
Image

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अतिक्रमणे काढल्यानंतर त्या भागात तातडीने रस्ते करा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आढावा बैठकीत संबधीत यंत्रणांना निर्देश

चाकण दि.8 प्रतिनिधी वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी हिंजवडीसह चाकण परिसरात काढण्यात येणाऱ्या अतिक्रमणानंतर त्या भागात तातडीने रस्ते विकसित करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने संबंधित यंत्रणांनी समन्वयातून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अपेक्षित प्रमाणात रस्त्यांचे रुंदीकरण करून रस्ते विकसित करण्याच्या दृष्टीने तातडीने पावले उचलण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आकुर्डी येथील मुख्यालयात त्यांनी चाकण भागातील वाहतूक कोंडी दूर करण्याच्या अनुषंगााने पाहणी केल्यानंतर आढावा बैठक घेतली, यावेळी ते बोलत होते.


Read More ..