गरोदर महिलेचा गर्भपात करताना मृत्यू ; तिच्या मृतदेहासह जिवंत दोन मुलांना नदीत फेकले तिहेरी हत्याकांड

2105 views

वडगाव मावळ दि.22 (प्रतिनिधी) गरोदर विवाहित महिलेचा गर्भपात करता मृत्यू झाला, त्यानंतर आरोपींनी महिलेचा मृतदेह नदीत टाकताना, महिलेची दोन्ही मुले आरडाओरडा करत असल्याने मुलांना जिवंत नदीत फेकले. ही घटना दि.6 ते 9 जुलै 2024 दरम्यान समता कॉलनी वराळे ता.मावळ येथे घडला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये मयत महिलेच्या वडिलांनी सोमवारी (दि.22) फिर्याद दिली. भारतीय न्याय संहिता 2023 कलम- 103 (1),105, 238. 90, 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Author : Admin
Publisher : admin
Update : 4 months ago
Date : Mon Jul 22 2024

imageमर्डर



पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून वडगाव मावळ न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

25 वर्षीय विवाहित महिला, 5 वर्ष व 2 वर्ष या तिघांची हत्या झाली आहे.


 गजेंद्र जगन्नाथ दगडखैर (वय 37, रा. समता कॉलनी, वराळे ता. मावळ जि.पुणे)

रविकांत भानुदास गायकवाड (वय 42, रा. डॉन बास्को कॉलनी ईश्वरानंद सोसायटी, सावेडी ता. जि. अहमदनगर, 

 गर्भात करणारी एजंट महिला बुधवंत (पुर्ण नाव पत्ता माहित नाही), अमर हस्पीटल कळंबोली मधील संबंधित डॉक्टर (पूर्ण नाव माहीत नाही) आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायण्णावर यांनी दिलेल्या माहितीनुसार मयत महिला गरोदर होती तिचा गर्भपात करण्यासाठी मुख्य आरोपी गजेंद्र दगडखैर त्याचा मित्र आरोपी रविकांत गायकवाड व एजंट महिला बुधवंत यांनी कळंबोली अमर हॉस्पिटलमध्ये नेले असता, महिलेचा गर्भपातादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी महिलेचा मृतदेह व दोन मुले घेऊन मावळ तालुक्यात इंदोरी हद्दीत इंद्रायणी नदीत महिलेचा मृतदेह टाकला व मुले आरडाओरडा करत असल्याने दोन्ही मुलांना नदीत फेकले. पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, आरोपी स्वतः फिर्यादी यांच्या घरी जाऊन चौकशी करत होता. महिलेची पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये हरवल्याची तक्रार दाखल केली होती, तपासाची सूत्रे फिरत अखेर आरोपींना जेरबंद केलं या घटनेत तिहेरी हत्याकांड झाल्याने परिसरात खळबळ उडाली. 6 ते 9 जुलै 2024 दरम्यान हा गुन्हा घडला आहे.

पोलीस व आपत्ती व्यवस्थापन यांच्यावतीने इंदोरी हद्दीत इंद्रायणी नदीपात्रात मृतदेह शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.



तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस करत आहेत.




लेटेस्ट अपडेट्स