1336 views
वडगाव मावळ दि.26 (प्रतिनिधी) घर मालकाकडून भाडेकरू महिला गरोदर राहिल्याने तिचा गर्भपात करताना मृत्यू झाला. तिच्या मृतदेहासोबत तिच्या दोन जिवंत मुलाला इंद्रायणी नदीपात्रात टाकून तिहेरी खून केला. ही घटना दि.6 ते 9 जुलै 2024 दरम्यान घडली. सोमवारी (दि.22 जुलै) रोजी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 25 वर्षीय विवाहित महिला, 5 वर्ष व 2 वर्ष या तिघांची हत्या झाली आहे. गजेंद्र जगन्नाथ दगडखैर (वय 37, रा. समता कॉलनी, वराळे ता. मावळ जि.पुणे), रविकांत भानुदास गायकवाड (वय 42, रा. डॉन बास्को कॉलनी ईश्वरानंद सोसायटी, सावेडी ता. जि. अहमदनगर), गर्भात करणारी एजंट महिला उषा निवृत्ती बुधवंत (वय 35, रा. कोपरखैरणे नवी मुंबई) व डॉ. अर्जुन शिवाप्पा पोळ वय 67 रा. अमर हॉस्पिटल, कळंबोली नवी मुंबई) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्य आरोपी गजेंद्र दगडखैर व रमाकांत गायकवाड याला वडगाव मावळ न्यायालयाने मंगळवार (दि.30) जुलैपर्यंत पोलीस कोठडीत दिली.
बुधवार (दि.24) रोजी गर्भपात एजंट उषा निवृत्ती बुधवंत (वय 35) या महिलेला कोपरखैरणे नवी मुंबई येथून अटक केली गुरुवारी (दि.25) वडगाव मावळ न्यायालयाने मंगळवार (दि.30) पर्यंत पोलीस कोठडी दिली.
गर्भपात करणारे डॉक्टर अर्जुन शिवाप्पा पोळ (वय 67) याला कळंबोली नवी मुंबई येथून शुक्रवारी (दि.26) अटक केली. दुपारी वडगाव मावळ न्यायालयात हजर केले असता, मंगळवार (दि.30) जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.
आरोपी घर मालक गजेंद्र दगडखैर यांच्याकडून भाडेकरू 25 वर्षीय महिलेला गरोदर झाल्याने तिचा गर्भपात करण्यासाठी मुख्य आरोपी गजेंद्र दगडखैर त्याचा मित्र आरोपी रविकांत गायकवाड व एजंट महिला उषा बुधवंत यांनी कळंबोली येथील अमर हॉस्पिटल चे डॉ. अर्जुन पोळ यांच्याकडे नेले असता, गर्भपातादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी महिलेचा मृतदेह व दोन मुले घेऊन मावळ तालुक्यात इंदोरी हद्दीत इंद्रायणी नदीत महिलेचा मृतदेह टाकला व मुले आरडाओरडा करत असल्याने दोन्ही मुलांना नदीत फेकले. पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, आरोपी स्वतः फिर्यादी यांच्या घरी जाऊन चौकशी करत होता. महिलेची पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये हरवल्याची तक्रार दाखल केली होती, तपासाची सूत्रे फिरत अखेर आरोपींना जेरबंद केलं या घटनेत तिहेरी हत्याकांड झाल्याने परिसरात खळबळ उडाली. 6 ते 9 जुलै 2024 दरम्यान हा गुन्हा घडला आहे.
अद्यापही तिहेरी हत्याकांडातील एकही मृतदेह सापडला नाही.
मृतदेह शोध मोहिमेत एनडीआरएफ सुदुंबरे, वन्यजीव रक्षक मावळ संस्था, आपदा मित्र खेड व मावळ, शिवदुर्ग मित्र लोणावळा, तळेगाव दाभाडे नगरपरिषद आदी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मावळात मुसळधार पावसाने इंद्रायणी नदीला महापूर आला होता. शोध कार्याला अडचणी आल्या. शुक्रवारी (दि.26) आळंदी परिसरात मृतदेह शोध मोहीम सुरू आहे.
या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश बांगर करत आहेत.