undefined कान्हे फाटा येथे उद्यापासून मोफत डायलिसीस उपचार सुविधा :- आमदार शेळके*

601 views

वडगाव मावळ दि.14 (प्रतिनिधी) मावळ तालुक्यातील मूत्रपिंड विकारांनी ग्रस्त रुग्णांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक सुविधा सुरू करण्यात आली आहे. उपजिल्हा रुग्णालय वडगाव मावळ (कान्हे) येथे उद्या, गुरुवार, दि. 15 मे 2025 पासून मोफत डायलिसीस सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे, अशी घोषणा मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केली.


Author : Admin
Publisher : admin
Update : 1 month ago
Date : Wed May 14 2025

image




ही उपयुक्त सेवा सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन, आमदार सुनील शेळके, पॉस्को, रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे, आणि जी. के. फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त प्रयत्नातून सुरू होत आहे.


डायलिसीस सेवा सोमवार ते शुक्रवार दरम्यान, सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत उपलब्ध राहणार आहे. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना त्यांच्या उपचारांचा मोठा आधार मिळणार आहे.



*उपचारासाठी आवश्यक सूचना*


1) उपचारासाठी येण्यापूर्वी 8080346234 या क्रमांकावर संपर्क करून आपल्या आजाराची माहिती द्यावी व अपॉइंटमेंट घेऊनच रुग्णालयात यावे.


2) रुग्णाने येताना खालील कागदपत्रांची झेरॉक्स प्रत सोबत आणावी :


* आजारासंबंधीचे सर्व वैद्यकीय अहवाल / कागदपत्रे

* रेशन कार्ड

* आधार कार्ड


या उपक्रमासाठी मावळचे आमदार मा. सुनिल शंकरराव शेळके यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. त्यांच्या पुढाकारामुळे मावळ परिसरातील रुग्णांना स्थानिक स्तरावर सुसज्ज व मोफत उपचाराची सोय उपलब्ध झाली आहे.


ही सेवा मावळ तालुक्यातील सर्व नागरिकांसाठी खुली असून गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.




लेटेस्ट अपडेट्स

56 views
Image

कार्यकर्ते हेच आमचे खरे बलस्थान; पुढील प्रत्येक निर्णय त्यांच्या सल्ल्यानेच :– आमदार सुनील शेळके

वडगाव मावळ दि.24 (प्रतिनिधी) “मी आमदार आहे, कारण तुम्ही माझ्या मागे उभे राहिलात. आज निर्णय घ्यायचे असतील, तर तोही तुमच्या सल्ल्यानेच घ्यायचा,” असे स्पष्ट शब्दांत सांगत आमदार सुनील शेळके यांनी पक्ष संघटनेच्या बळकटीसाठी कार्यकर्त्यांना केंद्रस्थानी ठेवण्याची भूमिका मांडली. वडगाव मावळ येथे पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मावळ तालुकास्तरीय पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात पक्ष संघटनेच्या सुदृढ बांधणीसाठी नवे संकेत दिले गेले. आमदार सुनील शेळके यांच्या सडेतोड भाषणाने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. पक्षातील निर्णयप्रक्रियेत पारदर्शकता, २० सदस्यीय समितीचा निर्णायक हस्तक्षेप, तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयार राहण्याचे आवाहन यामुळे हा मेळावा यशस्वी ठरला.


Read More ..
149 views
Image

गोल्डन रोटरी चा पदग्रहण समारंभ दिमाखात साजरा.

तळेगाव दाभाडे दि.18 (प्रतिनिधी) रोटरी क्लब ऑफ निगडी च्या सौजन्याने रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडेचा चार्टर प्रदान व प्रथम पदग्रहण सोहळा सुशीला मंगल कार्यालय या ठिकाणी मोठ्या उत्साहात दिमाघदार सोहळ्यात संपन्न झाला. सर्व सदस्यांनी एकसारखे जॅकेट घातल्यामुळे कार्यक्रमाची शोभा वाढली होती. 3131 चे प्रांतपाल शितल शहा व रोटरी क्लब ऑफ निगडी चे अध्यक्ष सुहास ढमाले यांच्या हस्ते चार्टर प्रदान करण्यात आले. याप्रसंगी प्रांतपाल शितल शहा सहप्रांतपाल अशोक शिंदे प्रा डॉ मिलिंद भोई सहप्रांतपाल दीपक फल्ले निमंत्रक किरण ओसवाल हे व्यासपीठावर उपस्थित होते.


Read More ..