उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते श्रीक्षेत्र भंडारा डोंगर पायी दिंडीला टाळ वाटप

419 views

तळेगाव दाभाडे दि.18 (प्रतिनिधी) इंदोरी येथील युवा उद्योजक प्रशांत भागवत यांच्या वतीने उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते श्रीक्षेत्र भंडारा डोंगर पायी दिंडीला बुधवारी (दि.18) सकाळी वा. पालखी प्रस्थानाच्या वेळी 50 मोफत देण्यात आले.


Author : Admin
Publisher : admin
Update : 4 months ago
Date : Wed Jun 18 2025

image

राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रीक्षेत्र भंडारा डोंगर येथील नवीन मंदिर बांधकाम पाहणी केली त्याच वेळी प्रशांत भागवत यांच्या वतीने आयोजित पायी दिंडीला टाळ वाटप कार्यक्रमात उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते टाळ वाटप करण्यात आले. प्रशांत भागवत यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.


याप्रसंगी आमदार सुनील शेळके, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, दशमी समिती अध्यक्ष बाळासाहेब काशिद पाटील, दिंडी समाजाचे अध्यक्ष रवींद्र महाराज ढोरे, उद्योजक विलास काळोखे, माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे, दिलीप ढोरे, सुरेश नाना दाभाडे, शिवाजी आण्णा पवार, भीमाजी दाभाडे, मनोहर मामा ढमाले, भगवान शिंदे, नवनाथ पडवळ, विणेकरी लक्ष्मण घोजगे, सरपंच शशिकांत शिंदे, दत्तात्रय ढोरे, विनोद वाघोले, रामभाऊ कराळे, पडवळ मामा, बहुसंख्येने वारकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

याप्रसंगी प्रशांत भागवत म्हणाले संत तुकाराम महाराज यांच्या भूमीत लाखो वारकरी येतात. श्रीक्षेत्र भंडारा डोंगर पायी दिंडीचे टाळ जीर्ण झाले होते. पायी दिंडीचे अध्यक्ष रवींद्र महाराज ढोरे यांनी सांगितल्याने 50 टाळ उपलब्ध केले. वारकरी संप्रदायाचा वसा वारसा जतन करण्याचे श्रीक्षेत्र भंडारा डोंगर पायी दिंडीच्या वतीने होत आहे. मी या पायी दिंडीचा सेवेकरी असल्याने सामाजिक बांधिलकीतून आज पायी दिंडी प्रस्थानाच्या प्रसंगी टाळ देताना आनंद होत आहे.





लेटेस्ट अपडेट्स

425 views
Image

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नूतन वास्तूचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते; 761 कोटी 17 लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ!

तळेगाव दाभाडे दि.19 (प्रतिनिधी) मावळ तालुक्याच्या विकासाचा नवा अध्याय सोमवार, दि. 20 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता लिहिला जाणार आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते शिवशंभू तीर्थ मैदान, तळेगाव येथे संपन्न होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त एकूण 761 कोटी 17 लाख रुपयांच्या लोकार्पण व भूमिपूजनाच्या कामांचा शुभारंभ होणार असल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली.


Read More ..