318 views
वडगाव मावळ दि.15 (प्रतिनिधी) जांभुळ येथील समर्थ बस सर्व्हिसेसचे युवा उद्योजक संदीप ईश्वर काकरे यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे बुधवारी (दि.15) ग्रामपंचायत कर्मचारी, शिक्षक व ग्रामस्थांना दिवाळी भेट वस्तू वाटप करण्यात आले. विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
युवा उद्योजक संदीप काकरे म्हणाले शून्यातून व्यवसायाला सुरू केली आज समर्थ बस सर्व्हिसेस व्यवसाय नावारूपाला आला. सामाजिक बांधिलकीतून गरीब गरजूंना मदतीचा हात देणं ही जबाबदारी समजून दरवर्षी गावातील ग्रामपंचायत कर्मचारी, शिक्षक व ग्रामस्थांना दिवाळी वस्तू वाटप उपक्रम राबवित असतो. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना शाळेत येण्या जाण्यासाठी होणारी पायपीट थांबविण्यासाठी सहा सायकलचे वाटप करण्यात आले.
दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास भावी पिढीसमोर ठेवण्यासाठी किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन करतो. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी 10 व 12 वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळ्याचे दरवर्षी आयोजन करतो. गाव माझा मी जांभुळ गावचा सेवक या भूमिकेतून सामाजिक कार्यात पुढाकार घेत असतो. महिलांसाठी दरवर्षी मोफत देवदर्शन यात्रेचे नियोजन करत असतो.
याप्रसंगी बाळकृष्ण काकरे, माजी उप सरपंच एकनाथ गाडे, विकास काकरे, विवेक काकरे, अमोल पोटवडे, अनिल काकरे, महेश काकरे, राजू गाडे, विराज काकरे, प्रतीक काकरे, अनिकेत काकरे, अमृत जांभुळकर, संदीप गाडे, गणपत गराडे, बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व
सूत्रसंचालन प्रतीक म. काकरे यांनी केले.
आभार महेश काकरे यांनी मानले.