*नगरपरिषदेच्या करवाढीस स्थगितीचा आदेश नगरविकास खात्याकडून जारी* *आमदार सुनिल शेळके यांच्या प्रयत्नांना यश*

297 views

तळेगाव दाभाडे, दि.21 (प्रतिनिधी) तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आलेल्या करवाढीला स्थगिती देणारा आदेश राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने काल (गुरुवारी) जारी केला. आमदार सुनिल शेळके यांच्या विनंतीवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याबाबत नगर विभागाला सूचना केली होती.


Author : Admin
Publisher : admin
Update : 6 months ago
Date : Fri Jun 21 2024

imageआमदार

 तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या वतीने करपुनर्मूल्यांकन करुन शहरातील मिळकतधारकांना वाढीव कर आकारणीबाबत नोटीस बजावल्या होत्या. प्रस्तावित दरवाढ ही 50 ते 200 टक्के असल्याने शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटली. आमदार शेळके यांनी 12 जूनला मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन शासनाने या बेकायदेशीर करवाढीला स्थगिती देण्याबाबत लेखी मागणी केली होती.नागरिकांनी वाढीव कर भरु नये तसेच करवाढी विरोधात हरकत नोंदवावी,असे आवाहनही त्यांनी केले होते. 




  

 *'नगरपरिषदेने केलेल्या कर आकारणी विरोधात राज्य शासनाने जीआर काढून स्थगिती दिल्याबद्दल तळेगावातील जनतेच्या वतीने सरकारचे आभार मानतो.'*

 *- आमदार सुनिल शेळके.*


 मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार नगरविकास विभागाचे कार्यासन अधिकारी वि.ना.धाईंजे यांनी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना लेखी पत्र पाठवून वाढीव कर आकारणीस स्थगिती दिली आहे. नगरविकास खात्याच्या आदेशात म्हटले आहे की, सध्या तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमध्ये सन 2024-2025 ते सन 2027-2028 या कालावधीतील चतुर्थ वाषिक कर आकारणीची प्रक्रिया सुरु आहे. सदर प्रक्रियेबाबत मा.विधानसभा सदस्य यांनी वस्तुस्थिती नमूद करुन सदर प्रक्रियेस स्थगिती देण्याची विनंती केली आहे.त्यावर मा.मुख्यमंत्री महोदयांनी,सदर प्रक्रियेस स्थगिती देण्याचे निर्देश दिले आहेत.

तळेगाव दाभाडे नगरपरिषद येथे सध्या “प्रशासक” असल्याने महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व

औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ च्या कलम-१६९ अतंर्गत समिती अस्तित्वात नाही. सदर वस्तुस्थिती

विचारात घेता, नविन अपिलीय समिती अस्तित्वात येईपर्यंत सदर प्रक्रियेस स्थगिती देण्याबाबत आपणास कळविण्याचे मला निर्देश आहेत,असे मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या आदेशात म्हटले आहे.




लेटेस्ट अपडेट्स

88 views
Image

“लोणावळा महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापकांचे अल्फा-क्लोरालोज कीटकनाशकावर संशोधन व आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये शोधनिबंध प्रकाशित”

लोणावळा दि.3 (प्रतिनिधी) अल्फा-क्लोरालोज (α-chloralose) हा एक विषारी अंमली पदार्थ आहे, जो उंदरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच पक्षी मारण्यासाठी सर्रासपणे वापरला जातो. लोणावळा महाविद्यालयातील प्राध्यापक संशोधकांनी प्रयोगशाळेत उन्नत स्पेक्ट्रोस्कोपिक तंत्रज्ञान, मॉलिक्युलर डाकिंग, सिमुलेशन आणि डीएफटी पद्धतींचा वापर करून मानवी शरीरातील रक्तात असलेल्या सिरम अल्ब्युमिन प्रथिनासोबत अल्फा-क्लोरालोज कीटकनाशकाची होणारी आंतरक्रिया उलगडली आहे. या संशोधनासंदर्भातला शोधनिबंध नुकतेच नेदरलँड येथून प्रकाशित होणाऱ्या “एल्सवेअर-जर्नल ऑफ मॉलिक्युलर लिक्विड, इम्पॅक्ट फॅक्टर ५.३” या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रकाशित झाला आहे.


Read More ..