वडगाव शहर भाजयुमो अध्यक्ष आतिश ढोरे यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा

176 views

वडगाव मावळ दि.6 (प्रतिनिधी) येथील वडगाव शहर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष आतिश ढोरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. अनावश्यक खर्चाला फाटा देत वडगाव मावळ या गावाची ओळख असलेल्या वडाच्या झाडांचे रोपण आणि कै.गोपाळराव देशपांडे वनवासी विद्यार्थी वसतिगृह येथे धान्यव खाऊवाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला.


Author : Admin
Publisher : admin
Update : 1 month ago
Date : Sun Jul 06 2025

image

अनावश्यक खर्चाला फाटा देत वृक्षारोपण आणि धान्यवाटप करून केला वाढदिवस साजरा



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध क्षेत्रातील अनेक सामाजिक उपक्रमांमधील एक असलेले 'ग्लोबल वॉर्मिंग' अर्थात जागतिक तापमानवाढ म्हणजे पृथ्वीच्या वातावरणातील तापमान वाढणे, ज्यामुळे हवामानावर परिणाम होतो. हे प्रामुख्याने मानवी गतिविधींमुळे वातावरणातील हरित वायूंच्या वाढत्या प्रमाणाने होते. यावर नियंत्रण म्हणजेच जास्तीत जास्त वृक्षारोपण आणि त्या वृक्षाचे संगोपन करणेसाठी हा उपक्रम करण्यात आल्याची माहिती आतिश ढोरे यांनी दिली.

वडगाव शहर भाजपा अध्यक्ष संभाजीराव म्हाळसकर यांनी या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त करत किमान १०० वटवृक्ष लाऊन त्यांचे संगोपन करण्याचा मानस व्यक्त केला.


माजी उपसरपंच सुधाकर ढोरे यांनी या उपक्रमाबाबत माहिती देत प्रत्येकाने आपआपल्या वाढदिवसानिमित्त असेच समाजोपयोगी आणि निसर्ग संवर्धनाचे उपक्रम राबविण्याची गरज असल्याचे सांगितले.


तीर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थान चे विश्वस्त सचिव अनंता कुडे यांनी जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या "वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे.." या अभंगतील रचणेप्रमाणे केवळ माणसांनाच नव्हे तर पक्षी , प्राणी सर्व जीवांना जगण्यासाठी प्राणवायूची गरज असते आणि ते वृक्ष आपणांस देतात त्यामुळे हा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम असल्याचे सांगितले.


वडगांव विविध कार्यकारी सोसायटी चे चेअरमन नारायणराव ढोरे यांनी देखील आपल्या मनोगतता या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.


प्रास्ताविक सरचिटणीस कल्पेश भोंडवे यांनी केले ज्यात त्यांनी दोन्ही उपक्रमांबाबत सविस्तर माहिती दिली.


मा. सभापती गुलाबराव म्हाळसकर , वडगांव शहर भाजपा अध्यक्ष संभाजीराव म्हाळसकर , युवा मोर्चा अध्यक्ष आतिश ढोरे, मा.उपसरपंच सुधाकर ढोरे , तीर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थान चे विश्वस्त सचिव अनंता कुडे , वडगांव शहर भाजपाचे कोषाध्यक्ष मकरंद बवरे , मा.नगरसेवक भूषण मुथा , वडगांव विविध कार्यकारी सोसायटी चे संचालक गणेश भालेकर, युवा मोर्चा महामंत्री कुलदीप ढोरे , संघटक संतोष भालेराव , विकी म्हाळसकर, संतोष हिरभगत , उद्योजक धनंजय पवार , महेंद्र मेहरा , युवा मोर्चा पदाधिकारी सलमान आत्तार , ओमप्रकाश देशमुख आदी उपस्थित होते




लेटेस्ट अपडेट्स

60 views
Image

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अतिक्रमणे काढल्यानंतर त्या भागात तातडीने रस्ते करा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आढावा बैठकीत संबधीत यंत्रणांना निर्देश

चाकण दि.8 प्रतिनिधी वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी हिंजवडीसह चाकण परिसरात काढण्यात येणाऱ्या अतिक्रमणानंतर त्या भागात तातडीने रस्ते विकसित करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने संबंधित यंत्रणांनी समन्वयातून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अपेक्षित प्रमाणात रस्त्यांचे रुंदीकरण करून रस्ते विकसित करण्याच्या दृष्टीने तातडीने पावले उचलण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आकुर्डी येथील मुख्यालयात त्यांनी चाकण भागातील वाहतूक कोंडी दूर करण्याच्या अनुषंगााने पाहणी केल्यानंतर आढावा बैठक घेतली, यावेळी ते बोलत होते.


Read More ..