*मावळातील प्रमुख विकास कामांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा*

557 views

वडगाव मावळ : दि.7 (प्रतिनिधी) कार्ला येथील आई एकविरा देवी तीर्थक्षेत्र विकास आराखडा, संत जगनाडे महाराज तीर्थक्षेत्र विकास आराखडा, कार्ला येथील चाणक्य सेंटर फॉर एक्सलेन्स, लायन्स व टायगर पॉईंट येथील ग्लास स्कायवॉक या कामाची निविदा प्रक्रिया 30 ऑगस्ट 2024 पर्यंत पूर्ण करून कार्यारंभ आदेश द्या, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.


Author : Admin
Publisher : admin
Update : 10 months ago
Date : Wed Aug 07 2024

imageविकास आढावा




*मावळातील चार महत्वाच्या विकास कामांचा 30 ऑगस्ट पर्यंत निघणार कार्यारंभ आदेश* 


*उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अधिकाऱ्यांना सूचना*



मावळातील प्रमुख विकास कामांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतला.उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात झालेल्या या बैठकीस क्रीडा मंत्री संजय बनसोडे, आमदार सुनिल शेळके, जलसंपदा, नियोजन, वित्त, क्रीडा, सार्वजनिक बांधकाम विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, पर्यटन विभाग या विभागांचे अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव यांसह प्रमुख अधिकारी आणि व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पुण्याचे जिल्हाधिकारी, पीएमआरडीएचे आयुक्त उपस्थित होते.




बैठकीत कार्ला येथील आई एकविरा देवी तीर्थक्षेत्र विकास आराखडा, संत जगनाडे महाराज तीर्थक्षेत्र विकास आराखडा, कार्ला येथील चाणक्य सेंटर फॉर एक्सलेन्स, लायन्स व टायगर पॉईंट येथील ग्लास स्कायवॉक या कामाची निविदा प्रक्रिया 30 ऑगस्ट 2024 पर्यंत पूर्ण करून कार्यारंभ आदेश देण्याबाबतच्या सूचना अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.


लोणावळा व कान्हे येथील उपजिल्हा रुग्णालय नूतन इमारतीमधील उर्वरित कामे, शस्त्रक्रिया गृह मोड्युलर करणे, फर्निचर व इतर कामांची निविदा प्रक्रिया तात्काळ राबवून दोन्ही रुग्णालये लवकरात लवकर सर्वसामान्यांसाठी खुली करण्याबाबत पवार यांनी निर्देश दिले.



जांभूळ येथील क्रीडा संकुलाचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी प्रतिक्षेत आहे. यासाठी राज्य क्रीडा विकास समितीची तात्काळ बैठक आयोजित करुन त्यात मंजुरी मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि क्रीडामंत्री यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.


इंद्रायणी नदीवरील टाकवे व कार्ला–मळवली रस्त्यावरील पुलांच्या कामाबाबत अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. ही कामे तात्काळ पूर्ण करावी. कान्हे रेल्वे उड्डाणपूल, एडीबी अंतर्गत कान्हे ते सावळा रस्ता यांसह इतर छोट्या - मोठ्या विकासकामांबाबत सखोल आढावा घेत सर्व विकासकामे अतिशय गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करण्याबाबत पवार यांनी सांगितले.



*सप्टेंबर महिन्यात विकासकामांचे लोकार्पण*


मागील साडेचार वर्षात मावळ तालुक्यात अनेक विकास कामे व महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात आले.या कामांचे लोकार्पण करण्यासाठी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार मावळमध्ये येणार आहेत.त्यांच्या हस्ते विकासकामे आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे लोकार्पण केले जाणार आहे.तसे निमंत्रण दिल्याचे आमदार शेळके यांनी सांगितले.





लेटेस्ट अपडेट्स

57 views
Image

कार्यकर्ते हेच आमचे खरे बलस्थान; पुढील प्रत्येक निर्णय त्यांच्या सल्ल्यानेच :– आमदार सुनील शेळके

वडगाव मावळ दि.24 (प्रतिनिधी) “मी आमदार आहे, कारण तुम्ही माझ्या मागे उभे राहिलात. आज निर्णय घ्यायचे असतील, तर तोही तुमच्या सल्ल्यानेच घ्यायचा,” असे स्पष्ट शब्दांत सांगत आमदार सुनील शेळके यांनी पक्ष संघटनेच्या बळकटीसाठी कार्यकर्त्यांना केंद्रस्थानी ठेवण्याची भूमिका मांडली. वडगाव मावळ येथे पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मावळ तालुकास्तरीय पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात पक्ष संघटनेच्या सुदृढ बांधणीसाठी नवे संकेत दिले गेले. आमदार सुनील शेळके यांच्या सडेतोड भाषणाने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. पक्षातील निर्णयप्रक्रियेत पारदर्शकता, २० सदस्यीय समितीचा निर्णायक हस्तक्षेप, तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयार राहण्याचे आवाहन यामुळे हा मेळावा यशस्वी ठरला.


Read More ..
155 views
Image

गोल्डन रोटरी चा पदग्रहण समारंभ दिमाखात साजरा.

तळेगाव दाभाडे दि.18 (प्रतिनिधी) रोटरी क्लब ऑफ निगडी च्या सौजन्याने रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडेचा चार्टर प्रदान व प्रथम पदग्रहण सोहळा सुशीला मंगल कार्यालय या ठिकाणी मोठ्या उत्साहात दिमाघदार सोहळ्यात संपन्न झाला. सर्व सदस्यांनी एकसारखे जॅकेट घातल्यामुळे कार्यक्रमाची शोभा वाढली होती. 3131 चे प्रांतपाल शितल शहा व रोटरी क्लब ऑफ निगडी चे अध्यक्ष सुहास ढमाले यांच्या हस्ते चार्टर प्रदान करण्यात आले. याप्रसंगी प्रांतपाल शितल शहा सहप्रांतपाल अशोक शिंदे प्रा डॉ मिलिंद भोई सहप्रांतपाल दीपक फल्ले निमंत्रक किरण ओसवाल हे व्यासपीठावर उपस्थित होते.


Read More ..