वडगाव नगरपंचायत श्री दत्त मंदिर जीर्णोद्धार, मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उद्यापासून बुधवारी

251 views

वडगाव मावळ दि.15 (प्रतिनिधी) वडगाव नगरपंचायत तीर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थान व समस्थ ग्रामस्थ आणि देणगीदार यांचे सहकार्याने उभारलेल्या श्री दत्त मंदिर जीर्णोद्धार, मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा बुधवारी (दि.16) ते शुक्रवारी (दि.18) रोजी करवीर पीठ कोल्हापूर चे जगद्गुरू विद्यानृसिंह भारती शंकराचार्य व संसदरत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांचे शुभहस्ते संपन्न होणार आहे.


Author : Admin
Publisher : admin
Update : 1 year ago
Date : Tue Oct 15 2024

imageमंदिर

  

करवीर पीठ चे जगद्गुरू विद्यानृसिंह भारती शंकराचार्य यांचे शुभहस्ते होणार कलशारोहण सोहळा


  या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य वारकरी पंथाचे प्रमुख ह भ प वैराग्यमूर्ती मारुती महाराज कुऱ्हेकर, भागवताचार्य गुलाब महाराज खालकर आणि ह भ प शंकर महाराज मराठे हें आशीर्वाद देणेसाठी तसेच मा राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे व आमदार सुनिलजी शेळके यांचे प्रमुख उपस्थिती मध्ये हा संपूर्ण तीनंदिवसीय कार्यक्रम संपन्न होत असताना तालुक्यातील अनेक मान्यवर व वारकरी मंडळ यावेळी उपस्थित राहणार आहे,



कार्यक्रमाची रूपरेषा पुढीलप्रमाणे बुधवार दिनांक 16 रोजी सकाळी 9 ते 12 श्री दत्त महाराज मूर्ती ग्रामदिंडी प्रदक्षिणा,साठी आळंदी येथील वारकरी भजन येणार असून संपूर्ण गावातुन दिंडी प्रदक्षिणा होणार असून नंतर महाप्रसाद,गुरुवार दिनांक 17रोजी संपूर्ण दिवसभर श्री दत्त मंदिर मध्ये होमहवन, पूजा व दुपारी महाप्रसाद आणि शुक्रवार दिनांक 18 रोजी प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा हा प्रमुख अतिथी महाराज व मान्यवर यांचे शुभहस्ते सकाळी 10वाजता संपन्न होणार असून दुपारी महाप्रसाद व सांगता समारंभ मावळ भुषण ह भ प तुषार महाराज दळवी यांचे सायंकाळी 6 ते 8 कीर्तन व नंतर महाप्रसाद असे नियोजन श्री पोटोबा महाराज देवस्थान चे मुख्य विश्वस्त किरण भिलारे, उपाध्यक्ष गणेशआप्पा ढोरे, विश्वस्त अनंता कुडे, चंद्रकांत ढोरे, ऍड अशोकराव ढमाले, ऍड तुकाराम काटे, अरुण चव्हाण, तुकाराम ढोरे, सुभाषराव जाधव, सुनिता कुडे व भास्करराव म्हाळसकर यांनी केले असून यामध्ये संपूर्ण गावातील ग्रामस्थांनी सहभागी व्हावे असे आवाहन विश्वस्त मंडळाने केले आहे.





लेटेस्ट अपडेट्स

408 views
Image

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नूतन वास्तूचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते; 761 कोटी 17 लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ!

तळेगाव दाभाडे दि.19 (प्रतिनिधी) मावळ तालुक्याच्या विकासाचा नवा अध्याय सोमवार, दि. 20 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता लिहिला जाणार आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते शिवशंभू तीर्थ मैदान, तळेगाव येथे संपन्न होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त एकूण 761 कोटी 17 लाख रुपयांच्या लोकार्पण व भूमिपूजनाच्या कामांचा शुभारंभ होणार असल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली.


Read More ..