683 views
वडगाव मावळ दि.7 (प्रतिनिधी) येळसे येथील संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक व सेवानिवृत्त प्राचार्य पांडुरंग धोंडिबा ठाकर सर वय ५९ यांचे अल्पशा आजाराने सोमवारी (दि.7) सकाळी ७:३० वा दुःखद निधन झाले.
नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ पवना विद्यालय व ज्यु. कॉलेज चे प्राचार्य पद भूषविले, विद्यार्थी प्रिय प्राचार्य असून अनेकांचे ते मार्गदर्शक होते.
त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे चार भाऊ दोन बहिणी, भावजयी पुतणे असा मोठा परिवार आहे
त्यांच्यावर दुपारी 1:30 वा येळसे पवना नदी काठी कोथुर्णे पुलाजवळ अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.