जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महावितरणकडून वृक्षारोपण

265 views

वडगाव मावळ दि.5 (प्रतिनिधी) जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वडगाव मावळ महावितरण उपविभागाकडून बेलज उपकेंद्रात गुरुवारी (दि.5) सकाळी 11 वा. 51 देशी व वनौषधी वृक्षांचे रोपण करण्यात आले.


Author : Admin
Publisher : admin
Update : 5 months ago
Date : Thu Jun 05 2025

image



" वडगाव मावळ महावितरण उप कार्यकारी अभियंता राहुल परदेशी म्हणाले माणसे नसतील तर झाडे जगातील पण झाडाशिवाय माणसं जगू शकणार नाहीत. प्रत्येक व्यक्तींनी जीवनात वयाप्रमाणे वृक्षारोपण करून संवर्धन संरक्षण करावे. तापमान वाढ रोखण्यासाठी वृक्षारोपण काळाची गरज आहे. वृक्षारोपणात देशी v वनौषधी वृक्षांचे रोपण मोठ्याप्रमाणावर करावे यामुळे वन्यजीवांना अन्न उपलब्ध होईल. पर्यावरणाचे संरक्षण करणे प्रत्येक व्यक्तींची जबाबदारी आहे."

याप्रसंगी सहाय्यक अभियंता तायप्पा भंडारे, कनिष्ठ अभियंता राहुल लकडे, कृष्णा कुसाळकर, ममताजी शिंदे, सुरेश पाटील, बहुसंख्येने लाइनमन उपस्थित होते.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक अभियंता तायप्पा भंडारे यांनी केले. सूत्रसंचालक कनिष्ठ अभियंता राहुल लकडे यांनी केले. आभार कृष्णा कुसाळकर यांनी मानले.




लेटेस्ट अपडेट्स

476 views
Image

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नूतन वास्तूचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते; 761 कोटी 17 लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ!

तळेगाव दाभाडे दि.19 (प्रतिनिधी) मावळ तालुक्याच्या विकासाचा नवा अध्याय सोमवार, दि. 20 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता लिहिला जाणार आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते शिवशंभू तीर्थ मैदान, तळेगाव येथे संपन्न होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त एकूण 761 कोटी 17 लाख रुपयांच्या लोकार्पण व भूमिपूजनाच्या कामांचा शुभारंभ होणार असल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली.


Read More ..