11889 views
कामशेत दि.11 (प्रतिनिधी) मेहुणी सोबत अनैतिक संबंध असल्याने साडूनेच केला साडूचा खून ही घटना शुक्रवारी (दि.10) रात्री 11: 30 ते शनिवारी (दि.11) सकाळी 8 वा. सुमारास इंद्रायणी ब्रीज मुंढावरे ता.मावळ हद्दीत उघडकीस आली. अनैतिक संबंधातील अडसर केला दूर, या घटनेने नात्याला काळिमा लागला. कोल्हापूर येथून आरोपीला 3 तासात अटक.
महेश मारुती अंभोरे वय 35 रा. तुंगार्ली लोणावळा ता. मावळ असे खून झालेल्या साडूचे नाव आहे.
आरोपी गुरुनाथ एकनाथ पाटील वय 32 रा. गोल्ड व्हॅली जैन मंदिर लोणावळा ता. मावळ असे आरोपी साडू चे नाव आहे.
पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार महेश अंभोरे यांचे लग्न मे 2025 मध्ये झाले. साडू गुरुनाथ पाटील यांचे, मयत साडू महेश अंभोरे हिच्या पत्नी सोबत अनैतिक संबंध होते. आरोपी गुरुनाथ याला मेहुणीला भेटता येत नसल्याने साडू महेश अंभोरे याच्या डोक्यात गंभीर जखम करून खून केला. अनैतिक संबंधातील अडसर दूर केला. मृतदेह मुंढावरे हद्दीत इंद्रायणी नदीच्या पुलाजवळ टाकून आरोपी फसार झाला. खुनाच्या घटनेची माहिती मिळताच कामशेत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांचे पथक घटनास्थळी दाखल होऊन खुनाच्या गुन्ह्याची उकल करून आरोपीला कोल्हापूर येथून 3 तासात अटक केली.
लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोणपे, पोलीस निरीक्षक शंकर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पाटील, सुनील पवार, पोलीस उप निरीक्षक बालाजी लोसरवार, दत्तात्रय शेडगे, पोलीस अंमलदार समीर करे, अमोल तावरे, कैलास लबडे, गणेश तावरे, मंगेश मारकड, अमित पडाळे, रवींद्र राऊळ आदींनी भेट दिली.
आरोपीला रविवारी (दि.12) वडगाव मावळ न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
पुढील तपास एलसीबी पुणे ग्रामीण, एलसीबी कोल्हापूर, पेठ वडगाव पोलीस स्टेशन आदींनी केला.