जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला लोणावळ्यातील विविध विकासकामांचा आढावा; रेल्वे उड्डाणपुलाच्या कामास होणार सोमवारपासून सुरूवात

471 views

लोणावळा दि.5 (प्रतिनिधी) लोणावळा शहरात विविध विकासकामांचा पाहणी दौरा व आढावा बैठक गुरुवारी (दि.5) संपन्न झाली. आमदार सुनील शेळके, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांच्या उपस्थितीत या बैठकीत शहरातील प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.


Author : Admin
Publisher : admin
Update : 1 year ago
Date : Thu Jun 05 2025

image

या दौऱ्यात गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या भांगरवाडी ते नांगरगाव दरम्यानच्या रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या संदर्भात जिल्हाधिकारी डुडी यांनी संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांना आदेश देत येत्या सोमवारपासून हे काम तातडीने सुरू करण्याच्या सूचना दिल्या.


बैठकीत पुढील महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली:


* *लोणावळा भाजी मंडईची दुरुस्ती व व्यवस्थापन*,

* *खंडाळा माध्यमिक शाळेच्या जागेचा वापर*

* *रिक्षा व टॅक्सी संघटनांच्या मागण्या*

* *शहरात नवीन पर्यटन केंद्र विकसित करण्याची गरज*,

* *वाहतूक कोंडीवर उपाययोजना व पर्यटकांची सुरक्षितता*.


त्यानंतर टायगर पॉइंट आणि लायन्स पॉइंट परिसरास भेट देऊन प्रस्तावित ‘ग्लास स्काय वॉक’ प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डुडी यांनी, सर्व विकासकामे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे, अशी स्पष्ट सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिली.


या दौऱ्यात लोणावळा शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी, रिक्षा व टॅक्सी संघटना, भाजी मंडई व्यापारी, पथविक्रेते, टपरी संघटना यांचे पदाधिकारी, तसेच उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC), पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA), भूमि अभिलेख, विद्युत व परिवहन विभाग यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


ही बैठक लोणावळा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरली.




लेटेस्ट अपडेट्स

1472 views
Image

मावळच्या 4 तहसीलदारांसह 10 अधिकाऱ्यांचे निलंबन ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा: मंगरूळ येथे 90 हजार ब्रास जास्त उत्खनन

नागपूर दि.13 (प्रतिनिधी) पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात वनीकरणासाठी राखीव असलेल्या क्षेत्रात तब्बल 90 हजार ब्रास अनधिकृत गौण खनिज उत्खनन झाल्याचे निष्पन्न झाल्याने महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी (दि.12) या घोटाळ्यात दोषी आढळलेले चार तहसीलदार, चार मंडळ अधिकारी आणि दोन तलाठी अशा दहा जणांना निलंबित करण्याचे निर्देश दिले. परवानगीपेक्षा जास्त उत्खनन केल्याने दोषीवर फौजदारी व महसुली अधिनियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.


Read More ..
573 views
Image

मावळात मल्टिनॅशनल कंपन्यांची कोट्यवधींची फसवणूक; दलालांची होणार चौकशी

नागपूर दि.9 (प्रतिनिधी) मावळ तालुक्यात गुंतवणुकीसाठी येणाऱ्या मल्टिनॅशनल कंपन्यांची काही दलालांकडून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले असून, याबाबत गंभीर आरोप आमदार सुनील शेळके यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात केले आहेत. हुंदाईसारखी कोरियन कंपनी महाराष्ट्रात आणणाऱ्या महायुती सरकारचा उद्देश रोजगारनिर्मिती असताना, काही दलालांनी कंपनीच्या व्हेंडरना बेकायदेशीर व फसवे दस्तऐवज दाखवून मिळकतीची विक्री करून आंतरराष्ट्रीय कंपनीलाच आर्थिक गंडा घातला, असे त्यांनी स्पष्ट केले.


Read More ..
1081 views
Image

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नूतन वास्तूचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते; 761 कोटी 17 लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ!

तळेगाव दाभाडे दि.19 (प्रतिनिधी) मावळ तालुक्याच्या विकासाचा नवा अध्याय सोमवार, दि. 20 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता लिहिला जाणार आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते शिवशंभू तीर्थ मैदान, तळेगाव येथे संपन्न होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त एकूण 761 कोटी 17 लाख रुपयांच्या लोकार्पण व भूमिपूजनाच्या कामांचा शुभारंभ होणार असल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली.


Read More ..