रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे अध्यक्षपदी संतोष परदेशी तर सचिव पदी प्रदीप टेकवडे

158 views

तळेगाव दाभाडे दि.11 (प्रतिनिधी) रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे च्या चार्टर अध्यक्षपदी संतोष परदेशी, उपाध्यक्षपदी प्रशांत ताये तर सचिव पदी प्रदीप टेकवडे यांची निवड करण्यात आली आहे.


Author : Admin
Publisher : admin
Update : 4 months ago
Date : Wed Jun 11 2025

image




रोटरी क्लब ऑफ गोल्डन चे अध्यक्ष संतोष शांताराम परदेशी तळेगाव नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सदस्य, दुर्गा माता मंदिराचे विश्वस्त,धर्मवीर नागरी सहकारी पतसंस्थेचे खजिनदार,फ्रेंड्स क्लब मित्र मंडळाचे सल्लागार,भोई समाजाचे विश्वस्त असून सामाजिक कार्याचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. त्यांच्या निवडीचे विविध स्तरातून स्वागत होत आहे.



तर सचिव पदी निवड झालेले प्रदीप दत्तात्रय टेकवडे स्वातंत्र्यवीर सावरकर गुरुकुलचे सचिव असून तिळवण तेली समाजाचे विश्वस्त आहेत.सामाजिक कार्याचा प्रचंड अनुभव त्यांच्या पाठीशी आहे.

उपाध्यक्षपदी प्रशांत रामचंद्र ताये यांची निवड करण्यात आली आहे सामाजिक कार्याचा वारसा असल्यामुळे प्रशांत ताये यांची निवड करण्यात आली आहे.

प्रशांत ताये डोळसनाथ उत्सव समितीचे माजी खजिनदार, भाजपा युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष,कान्होबा मित्र मंडळाचे सल्लागार आहेत.

या सर्वांचा चार्टर प्रदान व पदग्रहण समारंभ डिस्टिक गव्हर्नर शितल भाई शहा,डीआयजी वैभवजी निंबाळकर मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील आण्णा शेळके,माजी मंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, मा बापूसाहेब भेगडे, मा रामदास आप्पा काकडे या सर्वांचे उपस्थितीमध्ये रविवार दिनांक 15 जून रोजी सायंकाळी 6:30 वाजता सुशीला मंगल कार्यालय या ठिकाणी होणार आहे.

जागतिक स्तरावर काम करणारी ही संस्था असल्यामुळे तळेगाव शहरात विविध प्रकारची सामाजिक कार्य व सेवा या माध्यमातून करण्याची संधी मिळेल.

याच कार्यक्रमात आपत्कालीन परिस्थितीमध्ये मोफत डॉक्टर ही सेवा देणारे,अनाथ मुलांचे पालन पोषण करणारे, राष्ट्रीय युवा पुरस्कार (भारत सरकार) विजेते प्रा.डॉ.मिलिंद भोई यांचा समाज सेवा रत्न पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात येणार आहे.

प्रोजेक्ट चेअरमन दीपक फल्ले, निमंत्रक किरण ओसवाल यांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.




लेटेस्ट अपडेट्स

476 views
Image

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नूतन वास्तूचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते; 761 कोटी 17 लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ!

तळेगाव दाभाडे दि.19 (प्रतिनिधी) मावळ तालुक्याच्या विकासाचा नवा अध्याय सोमवार, दि. 20 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता लिहिला जाणार आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते शिवशंभू तीर्थ मैदान, तळेगाव येथे संपन्न होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त एकूण 761 कोटी 17 लाख रुपयांच्या लोकार्पण व भूमिपूजनाच्या कामांचा शुभारंभ होणार असल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली.


Read More ..