वरसोली ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी अरविंद बालगुडे यांची बिनविरोध निवड

340 views

लोणावळा दि.17 (प्रतिनिधी) वरसोली ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी अरविंद बालगुडे यांची आज शुक्रवारी (17 जानेवारी) रोजी बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच संजय खांडेभरड यांच्या अध्यक्षतेखाली वरसोली ग्रामपंचायतच्या कार्यालयामध्ये ही निवड प्रक्रिया पार पडली.


Author : Admin
Publisher : admin
Update : 9 months ago
Date : Fri Jan 17 2025

imageअरविंद बालगुडे





उपसरपंच नलिनी दत्तात्रय खांडेभरड यांनी विहित कालावधीमध्ये त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदावर अरविंद बालगुडे यांची निवड करण्यात आली. उपसरपंच पदासाठी त्यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.


यावेळी सरपंच संजय खांडेभरड, ग्रामपंचायत सदस्य नलिनी खांडेभरड, नारायण कुटे, रजनी राजू कुटे, मंदा नामदेव पाटेकर, राहुल सुतार, मीना शिंदे, सीता ठोंबरे, विजय महाडिक, ग्रामसेवक दीपक शिरसाठ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उप सरपंच पदी निवड झाल्याबद्दल बालगुडे यांचा सत्कार करण्यात आला. सा




लेटेस्ट अपडेट्स

394 views
Image

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नूतन वास्तूचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते; 761 कोटी 17 लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ!

तळेगाव दाभाडे दि.19 (प्रतिनिधी) मावळ तालुक्याच्या विकासाचा नवा अध्याय सोमवार, दि. 20 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता लिहिला जाणार आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते शिवशंभू तीर्थ मैदान, तळेगाव येथे संपन्न होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त एकूण 761 कोटी 17 लाख रुपयांच्या लोकार्पण व भूमिपूजनाच्या कामांचा शुभारंभ होणार असल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली.


Read More ..