540 views
तळेगाव दाभाडे दि.10 (प्रतिनिधी) येथील पणन मंडळाच्या राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे 3 महिन्यांपासून वेतन रखडले, 22 महिन्यांपासून महागाई भत्ता मिळाला नाही तसेच कालबध्द पदोन्नती 3 वर्षांपासून रखडली असून अधिकारी व कर्मचाऱ्यांना जगण्यासाठी खाजगी सावकाराचा आश्रय घ्यावा लागत आहे.
राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेच्या संचालक पदाचा अतिरिक्त पदभार डॉ.सुभाष घुले यांच्याकडे आहे.
या संस्थेत महिन्यांतून 1 ते 2 वेळा उपस्थित राहतात.
50 एकर जागेत 2002 साली स्थापन झालेल्या या संस्थेने 70,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना विविध पॉली हाऊस व शेड नेट या विषयावर प्रशिक्षण दिले आहे. संस्थेच्या आवारात मोठ्याप्रमाणात बांधकाम व नूतनीकरण करण्यासाठी मोठया प्रमाणावर निधी उपलब्ध होतो पण अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनावर खर्च करताना निधी उपलब्ध करून दिला जात नाही.
संचालक यांना अतिरिक्त मानधन, वाहन, चालक व डिझेल आदी सुविधा दिल्या जातात. पूर्णवेळ संचालक नसल्याने संस्थेत अनागोंदी कारभार दिसत आहेत. आशिया खंडातील एकमेव संस्था असून अधिकारी व कर्मचारी उपाशी; संचालक तुपाशी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
या संस्थेतील अधिकारी व कर्मचारी यांना जुलै ऑगस्ट महिन्याचे वेतन रखडले आहे. त्याचे 22 महिन्यांपासून महागाई भत्ता फरक दिला नाही. तसेच ऑगस्ट 2022 कालबद्ध पदोन्नती रखडली आहे.
वैद्यकीय बिले रखडली आहेत. अश्या परिस्थितीत अधिकारी व कर्मचारी यांच्यावर गृह कर्जाचे हप्ते, मुलांचे शिक्षण, औषधोपचार व किराणा यासाठी खाजगी सावकाराकडून कर्ज घेण्याची वेळ आली आहे. त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. गणेशोत्सव, गौरी सण कसा साजरा करावा. हा प्रश्न उपस्थित झाला आहे.